डांबरी रस्त्याची लागली वाट
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर सांगवी धनंजय जळगाव ह्या रस्त्यावरून धनंजय बेळगाव येथून रेती वाहतूक टेंडर घेण्यात आल्याची माहिती तहसील येथील महसूल अव्वल कारखून गादेवार यांनी दिली आहे .
सदर रेती 250 ब्रास वाहतूक परवाना देण्यात आला. आला असून ट्रॅक्टर टीपर च्या साह्याने वाहतूक करणार असल्याची माहिती देण्यात आली मात्र सदर वाहतुकी हायवा व टिप्परच्या साह्याने चालू आहे. त्यामुळे नवीन डांबरीकरण केलेल्या रस्त्याची वाट लागली आहे.
सदर रस्ते हे 25 वर्ष नंतर बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असून निधी आला तर थोडके मोडके रस्ते बनतात मात्र ह्या रस्त्यावरून हायवा सात-सात ब्रास रेती भरुन वजन घेऊन जात असताना सदर रस्ता पुन्हा एका महिन्यातच खराब होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्या रस्त्यावर हायवा बंदी करण्यात आली होती.
तत्कालीन जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर, आमदार राजेश पवार, यांनी सदर धनंज ,मेळगाव सांगवी, ह्या रस्त्यावरून हायवा ची वाहतूक बंद करण्यात यावी अशी आदेश दिले होते. त्याचबरोबर आमदार राजेश पवार यांनी सुद्धा या रस्त्यावर हायवाला वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊनही न जुमानता अवैध धंदेवाले दरोज रेती वाहतूक करताना हायवाचा वापर बिनधास्तपणे करत आहेत.
मात्र याकडे गावकरी लक्ष देऊन प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली असता .महसुली विभागातील अधिकारी व तहसीलदार ,कर्मचारी दुर्लक्ष करत आहे .त्यामुळे रस्ता पुन्हा खड्डे पडून पावसाळ्यात चालणे देखील कठीण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे सदर रेती वाहतूक हायवा च्या साह्याने करू नये , रेती वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा मेळावा धनंज येथील नागरिकांनी दिला आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा