नायगाव,उमरी,धर्माबाद मतदारसंघाचे आमदार मा.राजेश पवार यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे.
सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस सरकार सोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार स्विकारुण काँग्रेसबरोबरची युती तोडून दाखवावीच, असे आव्हानही नायगाव,उमरी,धर्माबाद, मतदार संघाचे आमदार मा.राजेश पवार यांनी दि 29 मार्च रोजी बुधवारी दुपारी 4 वाजता भारतीय जनता पार्टी चे कार्यालय धर्माबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा - शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभाग असेल.
स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत धर्माबाद,उमरी, नायगाव मतदार संघात गुरुवार, ३० मार्चपासून ते ६ एप्रिलपर्यंत सावरकर गौरव शोभा यात्रा काढण्यात येणार आहे, व तालुक्यात विविध विकास कामे प्रगतीपथावर असून थोड्याच दिवसांत काया पालट होईल अशी माहिती नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी दिली.
यावेळी आमदार यांचे विश्वासू भाजपा चे मा. तालुका अध्यक्ष विजय पाटील डांगे, सोशल मीडिया मराठवाडा संयोजक साईनाथ शिरपुरे, हिंदू युवा संघटना अध्यक्ष सतिश मोटकुल, शहर सरचिटणीस सज्जन गडोड, पंढरीनाथ भोजमोड, श्रीनिवास भुतावळे, आकाश आडपोड, श्याम बोईनवाड, गंगाप्रसाद गोसकुंलवाड,अंजु बालेमवार,राजु गोडगुलवार, संपादक ययाखान, अँड चक्रश पाटील यांच्या सह विविध पत्रकार संघटनेने अध्यक्ष पत्रकार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा