यात्रेचा उद्घाटन सोहळा दि.२ एप्रिल रोजी बोमनाळे आँईल मिल नायगाव येथे होणार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव:- लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने व विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी जगद्ज्योती म. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. राज्याच्या अर्थसंकल्पात विविध समाजासोबतच लिंगायत समाजाचाही विचार सरकारने केला आहे. या घोषणेमुळे लिंगायत समाजाबद्दल सरकारची सकारात्मक भुमिका लक्षात येते.
म्हणूनच समाज म्हणून या घोषणेचे स्वागत करण्यासाठी व राज्य सरकार तथा मा.ना.देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यासाठी राज्यातील एकंदरीत १५ विधानसभा मतदारसंघातुन जाणारी ही धन्यवाद यात्रा एकुण आठ दिवसांची असून या यात्रेचा उद्घाटन सोहळा बोमनाळे आँईल मिल, नायगाव जि.नांदेड येथे दि.२ एप्रिल रविवारी सकाळी १०:०० संपन्न होत आहे.
या धन्यवाद यात्रेच्या उद्घाटन सोहळ्यास नायगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.राजेश संभाजी पवार साहेब यांच्या सह यात्रा संयोजक तथा प्रदेश भाजपा उपाध्यक्ष मा.बसवराज मंगरुळे यात्रा कार्यवाहक तथा प्रदेश प्रवक्ते मा.शिवानंद हैबतपूरे, यात्रा संयोजन समिती सदस्य तथा प्रदेश प्रभारी दिव्यांग आघाडी व हिंगोली लोकसभा प्रभारी मा.रामदास पाटील सुमठाणकर प्रदेश वैद्यकीय सेल अध्यक्ष मा.डॉ. अजित गोपछडे धाराशिव लोकसभा प्रभारी तथा लातूर शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष मा.गुरुनाथ मगे,प्रदेश प्रवक्ते मा.प्रेरणाताई होनराव, प्रदेश युवा मोर्चा सचिव मा.अमोल निडवदे, लातूर जि.प.सदस्य तथा भाजपा नेते मा.बसवराज पाटील कौळखेडकर, चाकुर पं.स.उपसभापती मा.सज्जनकुमार लोनाळे इ. निमंत्रितांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत
.
या धन्यवाद यात्रेत एकुण १५ विधानसभा मतदारसंघात २५ धन्यवाद सभा, ३० लिंगायत संवाद बैठका व १९ लिंगायत मठांशी संवाद होणार आहे. नायगाव येथून सुरुवात होऊन ही यात्रा पुढे मुखेड- कंधार- कुरुळा-अहमदपूर- चाकूर-जळकोट-हंडरगुळी- नागलगाव-उदगीर- तोंडार-देवर्जन-देवणी- शिरुर अनंतपाळ -नळेगाव- लातूर -औसा- माकणी- लोहारा- जेवळी- काटगाव-नंदगाव- आलूर मार्गे जाऊन समारोप सोहळा दि.९ एप्रिल रविवारी मुरुम जि.धाराशिव येथे होणार आहे. तरी उद्या संपन्न होत असलेल्या या धन्यवाद यात्रेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याची विनंती या उद्घाटन सोहळ्याचे संयोजक मा.देविदास पाटील बोमनाळे, मा.भगवानराव लंगडापूरे,मा.रणजित पाटील ताकबीडकर,मा.राजू बेळगे, मा.युवराज पाटील लालवंडीकर, मा.बसवराज गुडपे यांनी केले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा