maharashtra day, workers day, shivshahi news,

ब्रम्हचैतन्य भजनी मंडळाकडून श्रीराम जन्मोत्सव साजरा

श्रीरामविजय ग्रंथाचे सामूहिक वाचन, आणि नामजप

Celebrating the birth of Shri Ram,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)

संपुर्ण भारतात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करत असताना मंगळवेढा  येथील शिवाजीनगर मधील ब्रम्हचैतन्य भजनी मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी गेली आठ दिवस श्रीरामविजय या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले. रोज सायंकाळी भजन करून श्रीरामाचा जप करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमात भजन,श्रीराम वंदना,पाळणा गाऊन श्रीराम जन्म भक्ती भावाने साजरा केला.

 सुरवातीला श्रीमती कमल केकडे व सौ माधुरी कुलकर्णी,सौ भाग्यश्री जाधव,सौ भाग्यश्री कुलकर्णी,सौ प्रफुलता स्वामी,सौ राजश्री कुलकर्णी,श्रीमती कुसुम पावले,श्रीमती कलुबर्मे यांच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम सादर करून श्रीराम आराधना केली.यावेळी रामा रघूनंदना,विजय पताका श्रीरामाची,कौसल्येचा राम,सुंदर ते ध्यान शोभे सिहासनी,रघु पती राघव राजाराम,गोदा काठी माझ्या इथल्या,नाम घेता नलगे मोल,राम जन्मला ग सखे,नाम तुझे रे नारायणा,नकोस नवखे परत फिरू यासारख्या अभंगाने श्रीरामाची भक्तिभावाने नामस्मरण करण्यात आले. कल्पेश कांबळे व आनंद अत्तार यांची पेटी व तबला वादनासाठी साथ लाभली.

आजच्या या भावी पिढीला आपले पारंपरिक उत्सवाची माहिती व्हावे या उद्देशाने ब्रम्हचैतन्य भजनी मंडळाने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाचे आयोजन केल्याचे सौ भाग्यश्री कुलकर्णी यांनी सांगितले.भजनी मंडळाच्या सदस्या सौ राजश्री कुलकर्णी व सौ सुजाता कुलकर्णी,प्रज्ञा कुलकर्णी यांनी प्रसादाचे वाटप केले.

यावेळी शिवजीनगरमधील सौ विद्या शेजाळ,सौ किर्ती कुलकर्णी,सौ सोनाली ढगे,सौ डॉ श्रद्धा कुलकर्णी,सौ स्वाती केकडे,सौ मुग्धा कुलकर्णी,श्रीमती शेजाळ,सौ मंदा खाडे,सौ प्रीती जाधव,सौ कुन्हाळे,मधुरा स्वामी,सम्यका केकडे,युक्ता कुलकर्णी,श्रेया हत्तीकट,नेत्रा कुलकर्णी,प्रसन्न स्वामी,श्रेया वरकुटे,राधा ढगे,मितांश कुलकर्णी,सार्थक केकडे याशिवाय जेष्ठ महिला निर्मला देसाई,कुसुम पावले सह अनेक महिला व मुली मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.दरवर्षीप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव माधव कुलकर्णी यांच्या श्रीराम निवासस्थानी संपन्न झाला.



----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !