विज वितरण कंपनीचे भोकर येथील वरिष्ठ तंत्रज्ञ दत्ता मेनकुदळे यांची कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
सध्या मार्च महिना चालू असून महावितरणची थकबाकी वसुली मोहीम जोरात सुरू आहे. मार्च महिन्यात दिलेले वसुली टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी कर्मचारी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. भोकर तालुक्यातील ग्रामीण शाखेतील पिंपळकोठा (मगरे) येथिल वरिष्ठ तंत्रज्ञ दत्ता सुभाष मेनकुदळे यांनी ग्राहकांना प्रेमाने आपुलकीने सुसंवाद साधत पारदर्शक सेवा दिली.मार्च एन्डचे ५ दिवस शिल्लक ठेऊन गावातील २९९ वीज ग्राहकाकडून ३ लाख ९२ हजार रुपयांची विज बिल थकबाकी वसूल केले.
१००% टक्के थकबाकीतून मुक्त केल्यामुळे भोकर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता साजिद शेख जिलानी, ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता बुध्ददिप विजय पाटील , शहर शाखेचे सहाय्यक अभियंता भंडारे , उपविभागाचे सहाय्यक लेखापाल अमित धारूरकर , ग्रामीण शाखेचे प्रधान तंत्रज्ञ गजानन देशमुख ,उच्च स्तर लिपिक श्याम मरमट, चव्हाण यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी भोकर ग्रामीण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद कळसे, तुकाराम कोरे बोईनवाड, राजू पांचाळ, राजेश्वर राहुलवाढ, मनकावार , चारलेवाड,वरिष्ठ तंत्रज्ञ तथा वीज कामगार को-ऑपरेटिव सोसायटी संचालक सतीश वाघमारे, कैलास मामीलवाड याच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांचाही महावितरण थकबाकी वसुली साठी नांदेड मंडळाचे मुख्य अभियंता अनिल डाये, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता हे मार्च एंड वसुलीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीज बिल वसुली मोहीम राबवीत असुन ग्राहाकांनी बिल भरुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आलेले होते.
भोकर ग्रामीण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद कळसे, तुकाराम कोरे बोईनवाड, राजू पांचाळ, राजेश्वर राहुलवाढ, मनकावार , चारलेवाड,वरिष्ठ तंत्रज्ञ तथा वीज कामगार को-ऑपरेटिव सोसायटी संचालक सतीश वाघमारे, कैलास मामीलवाड याच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.नांदेड परिमंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या संकल्पनेतून एक गाव एक दिवस अभियानांतर्गत २०२२ मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ दत्ता मेनकुदळे यांनी एका दिवसात पिंपळकोठा मगरे गावांतर्गत येणाऱ्या ८२ कृषी पंप धारकां कडून शेती पंपाचे वीज बिल (झिरो) थकबाकी मुक्त केले तर नांदेड पूर्वीचे परिमंडळाचे मुख्य अभियंता पडळकर यांच्या उपस्थितीत ९७ शेती पंपाच्या ग्राहकाकडून ८ लाख रुपये एवढी वीज बिल थकबाकी वसूली केल्यामुळे मेनकुदळे यांचा सत्कार केला.
घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांचाही महावितरण थकबाकी वसुली साठी नांदेड मंडळाचे मुख्य अभियंता अनिल डाये, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता, संजयकुमार चितळे हे मार्च एंड वसुलीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीज बिल वसुली मोहीम राबवत आहेत.भोकर ग्रामीण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद कळसे, तुकाराम कोरे बोईनवाड, राजू पांचाळ, राजेश्वर राहुलवाढ, मनकावार , चारलेवाड,वरिष्ठ तंत्रज्ञ तथा वीज कामगार को-ऑपरेटिव सोसायटी संचालक सतीश वाघमारे, कैलास मामीलवाड याच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा