महिला बचतगट वस्तुंचे विक्री जोमात
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मेंढिचा केसांपासून बनविलेली घोंगडी ला मुंबई महालक्ष्मी सरस वाशी मुंबई येथे महाराष्ट्र तुन उत्कृष्ट कामगिरी, उत्पादन, करणार्या गटाच्या महिला मेळाव्यात नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील महालक्ष्मी महिला बचत गटांना स्थान मिळाले आहे. मेंढी चा लोखरापासून बनवलेल्या घोंगडीला सर्वत्र महाराष्ट्रात मागणी आहे . मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी हे उत्कृष्टरित्या आरोग्यदायी असल्याचे संशोधनात म्हटले आहे . ग्रामीण भागापासून ते शहरात पूर्वी लोक या घोंगडीला पसंती देत आहेत.
कुंटूर येथे महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित करून घोंगडी व्यवसायला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षापासून ते घोंगडी बनवतात ह्या घोंगडी साठी सर्व लाकडी साहित्य लागतात त्याचबरोबर विजेची बचत विजेही लागत नाही त्यामुळे सदर घोंगडीला अस्सल गावरान केसापासून बनवलेल्या घोडीला सर्वत्र मागणी आहे . यामुळे मुंबई येथील होणाऱ्या महालक्ष्मी सरस येथील बाजारपेठामध्ये कुंटुरचे घोंगडीला सर्वत्र स्थान मिळाल्याने यामध्ये उत्सुकता महिला बचत गटाला लागली आहे . कुंटूर येथील महिला बचत गटाच्या दरवर्षीप्रमाणे मुंबई महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये प्रदर्शित केली जाते. त्यामुळे सदर महिला बचत गटाचे उत्पादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सर्वत्र विक्री व प्रदर्शनासाठी येत असताना त्यांची विक्री ही चांगल्या प्रकारे होत आहे त्यामुळे कुंटूरच्या घोंगडीला मुंबई ते पुणे दुसऱ्यांदा स्थान मिळाल्यामुळे त्या घोंगडीची पसंती ही महिला बचत गटाला चांगल्या प्रकारे गाजत असल्याचेही चर्चा सध्या नायगाव तालुक्यातील चर्चेला येत आहे.
6 मार्च ते 15 मार्चपर्यंत सदर मुंबई वाशी येथील मैदानावर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचा मेळावा भरला आहे . या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील घोंगडी ही सज्ज झाली असून सदर ह्या अस्सल गावरान वस्तूच्या घोंगडीला सर्वत्र पसंती दिसून येत असून हजारो रुपयाची उलाढाल होत असताना महिला बचत गटाचे कार्य सध्या कुंटूर परिसरामध्ये जोमाने दिसून येत आहे. त्यामुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी आर एल वाजे यांनी सर्व महिला बचत गटातील उत्पादन केलेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांच्या पुढील ही कार्य चांगल्या उत्पादन करून घोंगडीचा व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवावा असे शुभेच्छा दिले आहेत.
यावेळी समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे, महालक्ष्मी महिला बचत गटाचे अध्यक्ष म्हाळसाबाई वड्डे व सचिव गंगाबाई महादळे सदस्य कलुबाई देवदे ,शिवनंदा आंबटवाड ,अंजनाबाई देवदे चौत्राबाई संभाडे, देवघरे रूक्मीनबाई राधाबाई बहिरे, मोहनाबाई डोके अहिल्याबाई शेटे, संगिता महादळे ,इतर सदस्यांनी सर्व गटात तील घोंगडी हाताने तयार करून मार्केटमध्ये विकल्या विक्री करत असून आपल्या स्वतःचा व्यवसाय करून उत्पादनही मिळत असल्यामुळे पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री लक्ष्मण वाजे साहेब व एम एस आर एल एम चे तालुका अभियान व्यवस्थापक श्री मल्लेश एडके सर यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा