पाच लाख 37 हजाराचा दंड वसूल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
लोहा तालुक्यातील कोडगाव येळी व अन्य गावातील गोदावरी नदीतून गेल्यावर वर्षभरापासून रेतीमाफीनी उच्छाद मांडला असून दररोज रेती काढून रात्रीला टिप्परच्या साह्याने नायगाव तालुक्यात विक्री करण्यात येत आहे अशा तीन टिपला नायगाव महसूलच्या पथकाने पकडून दंडात्मक कारवाई केली आहे.
लोहा तालुक्यातील गोदावरी नदीमध्ये रेतीमाफीनी कोणालाही न जुमानता तराफे व वेगवेगळ्या यंत्राच्या साह्याने रात्रंदिवस पाण्यातून वाळू काढून मारताळा परिसरात साठवून ती वाळू रात्रीला नायगाव तालुक्यातील विक्री करण्याचा गोरख धंदा सुरूच आहे. याबाबत अनेक तक्रारी नायगाव महसूलच्या अधिकाऱ्याकडे प्राप्त झाल्या पण गेल्या वर्षभरात नायगाव महसूल कडून अशा एकाही वाहनावर कारवाई झाली नाही पण काल महसूल विभागाला कसे काय उजडले हे मात्र कळाले नाही.
दि. नऊ च्या पहाटे नायगाव महलुच्या पथकाने गडगा नरसी रोडवर वाळू भरून असलेला टिप्पर क्रमांक एम एस 26 5222 व एम एच 26 एडी 17 07 तर गोदामगाव जवळ एम एच 26, 8577 ये तीन वाहने पकडून नायगाव तहसील समोर लावण्यात आले. पकडलेला अवैध वाळू वाहतूक करणाऱे टिपर क्र. एम,एच, 26 1707 मालक नागोराव मोरे टाकळी त,ब याच्याकडून 1 लाख 7 हजार तर हायवा क्र.एम.एच.26,5222 चे मालक कृष्णा दशरथ भरकटे रा. कापसी गुंफा यांच्याकडून 2 लाख 15 हजार तर एम.एच.26 बी.ई.8577 चे मालक केशव ढेपे मारताळा यांच्याकडून 2 लाख 15 हजार असा एकूण 5 लाख 37 हजाराचा दंड करण्यात आला
बिलोली चे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आले असून कारवाई केलेल्या पथकात मंडळ अधिकारी एस.बी. कावळे, मंडळ अधिकारी कळकेकर, तलाठी बामणीकर, कोकरे, वाहन चालक पुरी यांचा समावेश होता वर्षभरानंतर चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर नायगाव महसुली कारवाई केली पण अशीच कारवाई पुढे चालूच राहणार का हे पुढील काळात कळणार आहे
गेल्या वर्षभरापासून मारताळा परिसरातून दररोज रात्री पंधरा ते वीस हायवा टिप्पर वाळू भरून नायगाव तालुक्यात खेड्यापाड्यात विक्री करून मोकळे होत आहेत यामुळे नायगाव तालुक्यातील बेळगाव येथे स्टॉक असलेल्या रेती चा लिलाव घेण्यासाठी कोणी फिरकत नाही हे मात्र विशेष
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा