रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जनजागरण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
वारंवार आपला जीव मुठीमध्ये घेऊन रस्त्यावरती वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांनी आणि पादचाऱ्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जनजागरण हेतू रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मांजरम व प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉक ऑन राईट ( रस्त्याच्या उजव्या बाजूने चला) या अभिनव उपक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कृष्णूर, जय भवानी माध्यमिक विद्यालय कृष्णूर, जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळा कुष्णूर तांडा या चारही शाळेतील तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी आणि गावातील बहुसंख्य लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे या भव्य रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
प्रथम सकाळी नऊ वाजता चारही शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे राष्ट्रगान घेऊन आणि सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा शपथ देऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये, सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सुरक्षा नियमांचे फलक देऊन व सर्व विद्यार्थ्यांच्या प्रचंड आवाजातील प्रेरणादायी घोषवाक्यांनी अक्षरशा एमआयडीसी कुष्णूर गाव, परिसर अगदी दुमदुमून निघाला होता.
सदरील कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख उद्धवराव ढगे,सदर संस्थेचे अध्यक्ष श्रीपत पाटील शिंदे मांजरमकर, शाळेचे मुख्याध्यापक हौसाजी वारघडे, संभाजी नावंदे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप आनंदराव जाधव, गजाननराव जाधव, शिवाजी पाटील जाधव माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर, तिरुपती पाटील जाधव, दिगंबर पाटील जाधव, परबता पाटील जाधव माजी पंचायत समिती सदस्य, रावसाहेब पाटील जाधव तंटामुक्ती अध्यक्ष, मुख्याध्यापक मठपती,शिक्षक नरवाडे, वाघमारे, सुधाकरराव पाटील जाधव ग्रंथालय अध्यक्ष, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख उद्धवराव ढगे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक हौसाजी वारघडे यांनी मानले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा