नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून होते कार्यरत
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी मंगळवेढा राज सारवडे)
एका शिक्षकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा शहरात घडली आहे.
रामचंद्र शेऊ राठोड (वय 47 रा.बनशंकरी कॉलनी, मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.याची फिर्याद मताचा भाऊ लिंबाजी शिवाजी राठोड (वय 52) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दि.28 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या पुर्वी फिर्यादीचा लहान भाऊ रामचंद्र शेऊ राठोड याने बनशंकरी कॉलनी येथेकोणत्यातरी अज्ञात कारणाने त्याचे रहाते घरातील बेडरुम मधील फँनला आकाशी रंगाचे साडीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मयत रामचंद्र राठोड हे मंगळवेढा नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? यासंदर्भात अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा