maharashtra day, workers day, shivshahi news,

मयत कविता घंटेवाडच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश वाटप

डॉ.मुकुंदराव पाटील बेलकर यांच्या वतीनेही 50 हजाराची मदत जाहीर

Financial assistance to the bereaved family,Kavita Khandwad, Khairgaon, nanded, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

 तालुक्यातील मौजे खैरगाव येथील कविता रामदास घंटेवाड वय 35 वर्ष ही महिला अण्णाभाऊ साठे महिला बचत गटात सक्रियपणे कार्यरत होती, अचानक अल्पशा आजाराने कविता ही मयत झाल्याने प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना अंतर्गत मयत कविता घंटेवाडच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश एसबीआय शाखा नायगावचे प्रमुख अधिकारी व डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर यांच्या हस्ते देण्यात आला असून यावेळी डॉ. बेलकर यांनी आपल्या वतीनेही पन्नास हजाराची मदत जाहीर केली आहे.

     खैरगाव येथील सर्व सामान्य असलेले रामदास घंटेवाड यांचे कुटुंब, कविता घंटेवाड यांच्या निधनामुळे उघड्यावर पडले. मयत कविता ही अण्णाभाऊ साठे महिला बचत गटास सदस्य म्हणून कार्यरत होती, सदर बचतगटाचा एसबीआय बँकेसोबत व्यवहार देखील चांगला होता, मुलीचे लग्न ठरलेले असताना या धावपळीच्या व दगदगीच्या युगात अचानक कविता हिच्या अंगात ताप भरला व या अल्पशा आजारातूनच तिचे दुर्दैवी निधन झाले, सामाजिक कार्यकर्त्या महानंदा गायकवाड व आय सी आर पी या समूह संसाधन असलेल्या कर्तव्यनिष्ठ सौ.निर्मला शिवराज भोसले यांनी सदर कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी घंटेवाड कुंटूबानी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा विमा पूर्वी काढलेला होता.

 या विम्याची कागदपत्रेची फाईल एसबीआयचे प्रोफेशन ऑफिसर रोहित भगत यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी आपल्या कर्तव्यात कसलाही कसूर न करता सदर विमा अंतर्गत दोन लाखाचा धनादेश काही दिवसात तयार करून डॉ.मुकुंदराव पाटील बेलकर यांच्या हस्ते आणि एसबीआय नायगाव शाखेचे मुख्य अधिकारी सौरभ कुमार, शाखा उप अधिकारी महेश बागडे, सहाय्यक अधिकारी कपिल गोमाशी, प्रोफेशन ऑफिसर रोहित भगत, सामाजिक कार्यकर्त्या महानंदा गायकवाड ,आय सी आर पी समूह संसाधनच्या सौ. निर्मला शिवदास भोसले, पत्रकार माधव बैलकवाड यांच्या उपस्थितीत मयत कविता घंटेवाडच्या कुटुंबास धनादेश देण्यात आला, सदर कुटुंबाची परिस्थिती पाहून डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर यांनीही यावेळी 50 हजार रुपयेची मदत देण्याची जाहीर केले. यावेळी राजेंद्र कांबळे दिगंबर झुंजारे व बँकेचे सर्व कर्मचारी व ग्राहक यांची उपस्थिती होती.

माझ्या कुटुंबावर जो आघात झाला त्यातून मला सावरण्यासाठी डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर, रोहित भगत साहेब,सौ. महानंदा गायकवाडताई,सौ. निर्मलाताई भोसले ,पत्रकार माधव बैलकवाड यांनी मदत केल्यामुळे मयत कविताचे पती रामदास घंटेवाड यांनी आभार व्यक्त करताना डोळ्यातील अश्रू अनावर झाले.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !