गावात घाणीचे साम्राज्य, ग्रामपंचायतचे मात्र साफ दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा परिषदेचे शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून कुंटुर ची ओळख आहे गावात अनेक भागात नालीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वार्ड क्रमांक 1 मधिल नागरिक माधव देवघरे यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना फोन करून नाली सफाई करा असे फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मि प्रभारी ग्रामसेवक आहे तुम्ही सरपंच यांना बोला
त्यांनी सरपंच चे पतीराज यांना फोन केला असता यानिहि सफाई कर्मचारी मिळतं नाही लवकर मिळाले कि सफाई करु असं आश्वासन दिले फोन बंद केला. यामुळे नागरिकांना गावात घाण पाण्यातुन मार्ग काढण्याची वेळ आली आहे. कुंटुर ग्रामपंचायत ला वार्षिक पंधराव्या वित आयोगाचा नीधी लाखो रुपये येतो . मात्र सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने सदर निधी इतरत्र कुठेही खर्च करून चांगभलं करतं आसत.
मात्र गावातील लोकांनचा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. गावात कचराचे ढिग , रस्त्यावर कचरा, नालीमधे घाण , घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. याकडे ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन कुंटुर येथील ग्रामपंचायत घ्या कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावात नाली सफाई, सी सी रस्ता बनवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा