तहसीलदार गजानन शिंदे झोपेत आहेत की, झोपेचे सोंग
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
शासन परवाना कुठेही व कसलाही नसताना लोहा तालुक्यातून कामळज येळी कौडगाव हातनी मारताळा मार्ग नायगाव तालुक्यात सरासपणे रेती दिवस व रात्री चालू असताना तहसीलदार गजानन शिंदे व महसूल अधिकारी झोपेत की झोपेचे सोंग घेत आहेत असा प्रश्न करीत दोषीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे युवा शिवसेनेने मागणी केली आहे.
लोहा तालुक्यातून नायगाव तालुक्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या जबाबदार महसूलच्या अधिकारी यांच्यासमोर सरासपणे रेतीची वाहतूक होत आहे सध्या तरी याकडे नायगाव तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे व लोहा तालुक्याचे तहसीलदार व मंडळ अधिकारी तलाठी यांनी बघून बघितले नसल्यासारखी करून अवैधरित्या वाहतूक करणारे वाळू माफियांना सूट देत आहेत त्यामुळे शासनास हजारो रुपयाचा गंडा घालवीत असताना महसूल अधिकारी मात्र आपले खिशी भरविण्यात मग्न आहेत असे सरास चित्र एकंदरीत दिसून येत आहे .
तेव्हा लोहा तालुक्यातून कामळज येळी कौडगाव हातनी मारताळा मार्ग नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होत आहे तेव्हा आपण ही विशेष बाब लक्षात घेऊन सदरील अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यास व महसूल अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावरही योग्य ती कारवाई करावी अशी मागणी युवा शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी यादवराव इबीतदार यांच्यासह गिरी परमेश्वर बाबा गुरु दिगंबर बेंद्रीकर माधव गंगाधर देशमुख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे ही मागणी केली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा