विद्यापीठ महिला क्रिकेट संघात कु . कांचन काकड हिची निवड झाल्याबद्दल सगळ्यानी तिचे कौतुक केले
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
आजकाल सगळ्याच क्षेत्रात मुली पुढे आहेत शिक्षणात, खेळात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातमुलींनी बाजी मारली आहे त्याच मुलीनं मधली एक हि कांचन काकड आहे तिने आपल्या गावाचे कॉलेजचे नाव रोशन केले आहे .
आमच्या नारायणराव नागरे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय दुसरबीड येथील बी .ए .प्रथम वर्ष सत्र 2022-23 ची विद्यार्थिनी कु. कांचन मदन काकड हिची संत गाडगेबाबा अमरावती, विद्यापीठ अमरावतीच्या विद्यापीठ क्रिकेट संघात दि . 10 मार्च 2023 ते 18 मार्च 2023 या काळात घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ क्रिकेट संघ (महिला) संघात महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे . ही बाब महाविद्यालयासाठी प्रतिष्ठेची असून त्यात निश्चित भर घालणारी आहे .
विद्यापीठ महिला क्रिकेट संघात कु . कांचन काकड हिची निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष मा . श्री .तोतारामजी कायंदे व सचिव मा. श्री . शिवराजभाऊ कायंदे यांनी तिचे कौतुक केले . तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विजय हिं. नागरे यांनी तिचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . तिचे मार्गदर्शक म्हणून प्रा . श्री .एस . आर .वाघ हे होते त्यांनीही तिचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा