निशिगंधा बॅंकेच्या चेअरमनपदी कल्याण काळे यांची हॅट्रिक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमन पदी कल्याणराव काळे यांची बिनविरोध निवड झाली असून तिसऱ्यांदा त्यांची चेअरमन पदी निवड झाली आहे .तर व्हाईस चेअरमन पदी डॉ.राजेंद्र मुरलीधर जाधव यांची एकमताने निवड झाली.
निवडणूक प्राधिकृत अधिकारी पी.सी. दूरगुडे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते .
कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली औसानयात निघालेली निशिगंधा बँकेने गेल्या दहा वर्षात उभारी घेतली असून 4717 सभासद संख्या असलेल्या निशिगंधा बँकेची सलग दुसऱ्यांदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाली आहे. बँकेच्या चाळीस कोटी ठेवी असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वाटप नव उद्योजकांना व तरुणांना करण्यात आले आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांचे उद्योग व्यवसाय उभा राहिले आहेत.
चेअरमन पदी निवड झाल्यानंतर बोलताना कल्याण काळे म्हणाले की सर्व संचालक मंडळ व बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गेली दहा वर्ष बँकेचा आर्थिक कारभार अतिशय सूक्ष्मपणे करत असताना अडचणीच्या कालखंडात लघुउद्योजकांना बँकेच्या मार्फत कर्जपुरवठा करून त्यांना उभा करण्याचे काम केले आहे सर्व सहकाऱ्यांच्या विश्वासाने कोट्यावधी रुपयांच्या ठेवीसह कर्ज पुरवठा केला आहे . इथून पुढेही बँकेच्या प्रगतीसाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत मागील 10 वर्षात सभासदांनि टाकलेल्या विश्वासास पात्र राहून भविष्यात स्वतःची इमारत व शाखा विस्ताराबरोबरच सोयी सुविधा पुरवण्यासाठी व बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सभासदांचे व संचालकांचे आभार मानले
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा