दिल्ली येथील जंतर मंतर वर जमणार ओबीसी प्रतिनिधी - श्री सुदर्शन बोराडे यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता 28 मार्च 2023 रोजी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या प्रलंबित असून या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात या करता राष्ट्रीय ओबीसी महासंघ निदर्शन करणार आहे निदर्शनाचा कार्यक्रम राष्ट्रीय विषयी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायडे ,महासचिव सचिन राजूरकर ,राष्ट्रीय समन्वयक डॉ.अशोक जीवतोडे, यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहे .
या निदर्शने कार्यक्रमात देशभरात विविध राज्यातून सुमारे 5000 प्रतिनिधी सहभागी होतील अशी माहिती सुदर्शन बोराडे यांनी दिली .केंद्र सरकारशी संबंधित ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांचा या आंदोलनात समावेश करण्यात आला आहे .या निदर्शने आंदोलनाच्या निमित्ताने येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. देशातील ओबीसी समुदाय लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा 27% राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी.केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गातील नोकरीतील 27 टक्के जागा त्वरित भरण्यात याव्या इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा