कॉलेज मध्ये चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील धनंज येथील रहिवासी असळलेले वैजनाथ नानाजी जाधव यांचे सुपुत्र डॉ.अविनाश वैजनाथ जाधव याना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई जि. बीड येथून एम.बी.बी.एस.अंतिम वर्षात उत्तीर्ण होऊन नीट पीजी. मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ५४२ गुण घेऊन यश मिळवले असल्याने माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव पा.चव्हाण यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
डॉ.अविनाश जाधव यांचे पहिली ते १० वी पर्यंत सगरोळी येथिल श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल शारदा नगर या शाळेमध्ये शिक्षण घेऊन दहावीमध्ये ९५ टक्के मार्क घेऊन यशाची पहिली पायरी सुरू करून पुढील शिक्षण यशवंत महाविद्याय, नांदेड येथून १२ वि मध्ये ८८ टक्के गुण घेऊन सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या CET परीक्षेत मध्ये ७०० पैकी ५०५ गुण घेऊन एमबीबीएसला प्रवेश मिळविला.सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एमबीबीएस ची अंतिम वर्षात उत्तीर्ण होऊन नीट पीजी. मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ८०० पैकी ५४२ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असल्याने त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बिकट परिस्थितीमध्ये MBBS चे शिक्षण केले पूर्ण
वैजनाथ जाधव या शेतकऱ्याचें सुपुत्र अविनाश जाधव यांच्या बालपणीच आईचे छत्र हरवले.आईविना पोरकं झालेल्या डॉ.अविनाश जाधव यांनी कसोटीने शिक्षण घेऊन आज त्यांनी बिकट परिस्थितीमध्ये MBBS चे शिक्षण पूर्ण केले असल्याने बालाजी कोंडीबा सूर्यवंशी , माधवराव जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी ,रणजित हंबर्डे व्यंकटराव सूर्यवंशी उपसरपंच ,हणमंत कुर्हाडे, विठ्ठल जाधव,प्रकाश हंबर्डे ,शरद हंबर्डे, लक्ष्मण सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी, प्रकाश धडेकर, साईनाथ पांचाळ , गौतम धडेकर, रुक्माजी सूर्यवंशी , माधव सूर्यवंशी तंटामुक्ती अध्यक्ष ,नागोराव जाधव ,रहिमानसाब शेख, आदी गावकऱ्यांतून कौतुक केले जात आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा