नऊ वर्षाचा अथर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत ठरला आकर्षणाचा विषय
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कुंटूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक शिव जयंती मंडळ यांच्या तर्फे सर्व धर्मातील तरुण एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिव जयंती मोठ्या उत्साहात ताटात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजेश कुंटूरकर, रुपेश कुंटूरकर, लक्ष्मण पाटील अडकिने, बाबुराव पाटील अडकिने, जगजेराव पा कदम, के टी सर , गणेश जाधव, मोहनराव होळकर, पत्रकार पवनकुमार पुठ्ठेवाड, तुकाराम जाधव, व गावातील प्रमुख सर्व धर्मातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील रेखावार यांनी केले केले तर राजेश कुंटूरकर यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकून ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शिवजन्मोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल, व शांती निकेतन विद्यालय शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी सुंदर असे छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले विचार मांडले व पोवाडे गायले.
अथर्व अशोक मटवाले या नऊ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा करून आल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सुंदर असे विचार आपली माडले . सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे भाषण झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची गावातील मुख्य रस्त्याने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
शिवजन्म महोत्सव हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती सार्वजनिक समितीचे अध्यक्ष रतन झुंजारे, भगवान सांगवे, राऊसाहेब कदम , गौरव भोसले, आमोल सोमठाणे, आकाश जाधव , सुनील शिंदे, गंगाधर दुगावे, बालाजी पुठ्ठेवाड, राहुल नाईकवाडे, संजय धामणगावे, आकाश भोसले, कुंटूर नगरीतील सर्व समाजातील तरुण युवक मंडळींनी अति परिश्रम करून शिव जन्म महोत्सव यशस्वीरित्या पार पाडले.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा