नागरिकांच्या संपर्कात आल्यास नागरिकांनाचा आरोग्यास होणार परिणाम - प्रभारी पशु वैद्यकीय अधिकारी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गावातील कुत्र्यांना खरंच आजार झाला आहे. मी ग्रामविकास अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना सांगितलं कुत्र्यांना पकडून पशु वैद्यकीय रुग्णालयात आणा मी त्यांच्या लसीकरण करून त्यांना योग्य ते उपचार करेन, मग नागरिकांना त्रास होणार नाही मात्र ग्राम विकास अधिकारी यांविषयी त्यांनी काही सांगितले नाही त्यामुळे लसीकरण एकाहि कुत्र्याचे झाले नाही. आजार हा कुत्र्यांमध्ये जास्त वाढला तर नागरिकांच्याही संपर्कात येऊ शकतो पुन्हा लसीकरण करणे अवघड होईल
डॉ. देवकते पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1
नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील एकूण शंभरच्या वर कुत्र्यांना खरुजाचा आजार झाला असून काही कुत्रे नासुन गेले आहेत. कुंटुर ग्रामपंचायती मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे . पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवकते यांनी ग्रामविकास अधिकारी नागेश येडसनवार च्याशी भेट घेतली असता त्यांनी सांगितले की सदर जनावरांना कुत्र्यांना योग्य वेळी लसीकरण केले तरच त्यांचा रोग बरा होण्यास एक महिन्याचा अवधी लागेल नाहीतर सदर कुत्रे नासून गेल्यानंतर माणसाच्या संपर्कात आल्यास आरोग्यावर परिणाम होऊन ही खरुज माणसांनाही घातक आहे .
आज तीन महिने कालावधी लोटला तरीही ग्रामपंचायत अंतर्गत कोणतेही उपाययोजना केली जात नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. गावातील मुले बाळे महिला पुरुष कुत्र्यांच्या संपर्कात येत असून पाळीव प्राणी ही त्यांच्या संपर्कात आल्याने सदर आजार वाढल्यास नागरिकाच्या आरोग्यासाठी परिणाम होऊ शकतो सध्या उन्हाळ्यामध्ये सर्दी खोकला या वायरसचाही चर्चा सर्वत्र दिसून येत असून कुत्री खरंच पुन्हा नागरिकांच्या संपर्कात आल्यास नागरिकांना पुन्हा आरोग्यास परिणाम होईल याकडे कुंटूर येथील गावातील ग्रामविकास अधिकारी नागेश येडसनवार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जाते.
मी ग्रामविकास अधिकारी नात्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोललो व त्यांना आमच्या मासिक मीटिंगमध्ये बोलावून घेतले कुत्र्यांना होणाऱ्या आजाराविषयी विचारले त्यांच्यावर उपचार करून व्हॅक्सिनेशन केल्यास लवकर बरा होईल असे त्यांनी सांगितले मात्र आम्ही नगरपंचायत व महानगरपालिका कडे पशु पकडणारे वाहन साठी माहिती घेतली असता पशु पकडणारे वाहनच मिळत नाही त्यामुळे कुत्र्यांना कसे पकडणार व त्यांच्यावर लक्षीकरण कसे होईल याच्यामध्येच वेळ झाला आहे. त्यामुळे तीन महिन्याच्या कालावधीत लोटला लवकरच आम्ही काहीतरी उपाययोजना करून सर्व कुत्र्यांना जनावरांना लसीकरण करून योग्य ते उपचार करण्यात येईल अशी माहिती ग्राम विकास अधिकारी नागेश येडसनवार यांनी सांगितले.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा