पालकांनी केली सीडीपिओकडे तक्रार सुपरवाझर यांनी केली चौकशी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर येतील अंगणवाडी क्रमांक 2 येथे बालकांना दिला जाणारा पोषक आहार मध्ये चचक आळ्या आढळून आल्याने पालकांनी सदर आहार घेऊन अंगणवाडी मध्ये जाऊन शिक्षीका मदतनीस यांना आमचा मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार का दिला असा जाब विचारला.
गावातील चार पालकांनी नायगाव तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्या तक्रारी ची तात्काळ दखल cdpo ने घेतली व सर्कल सुपरवायजर कबीर यांना चौकशीसाठी पाठवले. सदर अंगणवाडी क्रमांक 2 शिकक्षीका शेख सायराबी पाशा यांची चौकशी केली असता सर्व आहार, वटाने, मध्ये चक्क अळ्या आढळून आल्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे चौकशी रिपोर्ट सादर करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले.
त्यामुळे कुंटुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल अशी माहिती सुपरवाझर कबीर यांनी सांगितले. यावेळी पालक बालाजी लक्ष्मण हंनमते, सययद मैनुद्दीन शेख, सिद्धार्थ मारोती गजभारे उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी क्रमांक 2 शिक्षिका शेख सायराबी पाशा , मदतनीस, अंगणवाडी क्रमांक, संगेवार ताराबाई शिक्षीका, रेखावार यावेळी उपस्थित होते.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा