नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व सर्व कर्मचारी संघटना आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एकवटल्या
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आपल्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांनी दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संपावर असल्याने त्यात सहभागी झालेले नायगाव नगरपंचायतचे कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर बापुले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत.
असा एकही व्यक्ती नाही किंवा एकही विविध कार्यालयातील कर्मचारी नाही की, त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या. म्हणून महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एकवटले आहेत त्यात नायगाव नगरपंचायतचे कर्मचारीही या संपात सहभागी झालेले असून रीतसर त्यांनी दिनांक 1 मार्च 2023 रोजी आपल्या मागण्या संदर्भात लेखी निवेदन दिलेले आहेत त्यांच्या मागण्याला शासनाकडून दुजोरा मिळाल्याने दिनांक 14.3. 2023 पासून बेमुदत्त संपावर जाणार असल्याचे निवेदन दिले असून सदर निवेदनात कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर संभाजी बापुले यासह श्रीधर कोलमवार, संभाजी भालेराव, गोपाळ नाईक, शेख चांद साब, घनशाम वरणे, बालाजी बोईनवाड, साहेबराव चिंचोले, खुशाल सालेगाये, रमेश चव्हाण, श्रीराम बेळगे ,मारुती गायकवाड, बालाजी चव्हाण, दिलीप वाघमारे, उमेश कांबळे, साईनाथ बेळगे, मुन्ना मंगरुळे, लालबा भेंडेकर, गणेश चव्हाण, अजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नायगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जात असल्याने त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार घालून अभिवादन केले याप्रसंगी संपावरील कर्मचारी वर्गांच्या मागण्या रवींद्र पाटील चव्हाण यांनी भेट देऊन समजून घेतले आहेत.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा