अपघात की घातपात याबाबत साशंकता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा (प्रतिनिधि शिवाजी कंटूरकर)
राजापूर येथील पत्रकार वारीसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच तशीच घटना नांदेड जिल्ह्यात घडल्याचे समोर आले.
कंधार येथील पत्रकार संजय कंधारकर यांचा हि अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने मृत्यु झाला आहे हा खरच अपघात आहे की घातपात याची चौकशी करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे.
कंधारकर हे लोहा येथुन कंधार कडे कामासाठी जात असताना कॅनल जवळ अवैध मुरुम घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने संजय कंधारकर यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते जागेवरच खाली पडले कंधारकर जखमी अवस्थेत तासभर तसेच पडून होते. मात्र त्यांना मदत मिळाली नाही.
यावेळी घटनास्थळापासून जाणाऱ्या एका डॉक्टरने त्यांचा आणि पत्रकार ओळखपत्राचा फोटो काढून तो व्हायरल केला यावरुन त्यांची ओळख पटली नंतर त्यांना शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्यावर दि.3 मार्च रोजी गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले.उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद तर्फे निषेध केला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा