maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडे यांचा विकास कामांचा धडाका

मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
Development work, MLA samadhan autade, pandharpur, mangalwedha, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे विकासरत्न आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर झालेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा व गोंदवले महाराज मठ या रस्त्याचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेचे बेस्ट सभापती मा. सोमनाथ जी आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमासप्रसंगी बोलताना सभापती महोदय यांनी सांगितले की, पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आणि प्रगतीचा ध्यास घेतलेले लोकनायक म्हणून आमदार महोदय यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील मूलभूत आणि पायाभूत बाबींचा धोरणात्मक विकास करण्यासाठी आमदार समाधान दादा आवताडे हे कोणताही राजकीय आकस डोळ्यासमोर न ठेवता सर्व समावेशक निधीची तरतूद करण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. गाव पातळीवर राजकीय अथवा गट तट यांचा झेंडा बाजूला ठेवून गावाचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि एकविचाराने आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची कास सुधारली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते वीज पाणी शैक्षणिक सुख सोयी आरोग्य आदी  बाबीसाठी भरगोस असा निधी आणून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या विकास कामासाठी कुठेही कमी न पडता काम करत असून आपणही कुठल्या कामासाठी मागणीला कमी न पडता आपण आपल्या मागण्या करा आमदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावाच्या विकासासाठी वचनबद्ध असो असे आवाहन यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक आवताडे यांनी केले. या कामाचे भूमिपूजन सभापती महोदय यांच्या हस्ते तर जेष्ठ नेते श्री दिलीप भाऊ गुरव यांच्या उपस्थितीत झाले 
सदर प्रसंगीसदर प्रसंगी  सरपंच श्री.विलास मस्के,उपसरपंच उदय पवार, श्री महेश दादा चव्हाण, मा.उप.विक्रम आसबे,श्री.सचिन आसबे,श्री.पांडूरंग देवमारे,श्री.अरुण बनसोडे,श्री.आश्विन बुरले,श्री.अजय जाधव,श्री. राहुल माने,श्री.ओंकार भोसले,श्री.योगेश रसाळ,श्री.संजय माळी,श्री. हनुमंत शिंदे,श्री.योगेश कांबळे,श्री.दत्ता घोडके,श्री.विजय भूमकर,श्री.नागू तात्या बनसोडे,श्री.विष्णू बनसोडे,श्री.गोपाळ म्हेत्रे,श्री.अमोल पाटील,श्री.आकाश चव्हाण,श्री.रवी केसकर,श्री.दत्ता पिसे,श्री. दिपक सुरावसे,श्री. रघुनाथ पवार,श्री.बबलू आसबे,श्री.मुकेश पंडित,श्री.महेश वावरे आधी उपस्थित होते
अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये वाढता संपर्क व दळणवळणाच्या सुविधा या बाबी लक्षात घेता सुव्यवस्थित व दर्जेदार रस्ते बांधणी ही काळाची गरज बनली आहे. मतदार संघातील जनतेच्या या भौतिक सुविधांचा विचार करून आमदार समाधान आवताडे हे नेहमीच सहकार्य कौशल्याने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत असतात. आमदार  अवताडे यांची ही विकासदृष्टी पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाचा चेहरा - मोहरा बदलण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थी यांना नियोजन जागी पोहोचण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे...
श्री.राहुल माने      
ग्राम पंचायत सदस्य गोपाळपूर     
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !