वन विभागाकडून कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव : सहायक वनसंरक्षक यांनी बातम्यांची दखल घेवून नायगाव तालुक्यात कुष्णूर, नायगाव, पिंपळगाव व नरसी येथे कारवाई केली. या कारवाईत एक साँ मिल सिल करण्यात आली तर नायगाव येथील साई मुरमुरा कंपनीत ३० टन तर पिंपळगाव शिवारात लाकडांचे ९० नग जप्त करुन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे देगलूर वन परिक्षेत्राचे अधिकारी मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करत असल्याने त्यांचीही झाडाझडती घेतली आहे.
नायगाव तालुक्यात मागच्या दोन महिण्यातून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल वाढली होती तर मांजरम भागातून सागवानाची तस्करी होत होती. याबाबत माध्यमातून वेळोवेळी बातम्या प्रकाशित करुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांची पोलखोल केली होती. सत्य व वस्तुनिष्ठ बातम्यांची नांदेडचे उपवनसंरक्षकांनी दखल घेत सहायक वनसंरक्षक बी एन ठाकूर यांनी बुधवारी दिवसभर नायगाव तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक नांदेड सी.जी पोतलवार यांना सोबत घेवून धाडसत्र राबविले. एमआयडीसी कुष्णूर येथील बंद असलेले बाप्पा चिवडा फॅक्टरी व ग्रीन कन्सेप्ट फॅक्टरी मध्ये लाकडी गुटका आढळून आला त्याच्या वैद्यतेबाबत चौकशी करण्याच्या सूचना संबंधित वनरक्षकाला देण्यात आल्या. तर नायगाव येथील मुरमुरा कारखान्यात ३० टन लाकडाचा साठा आढळून आला त्यामुळे कारखाना मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला.
पिंपळगाव या गावात मोकळ्या जागेमध्ये साठा केलेले लाकडे आढळून आले. त्यावरून वनरक्षक गजानन कोतलवार यांच्याकडे विचारणा केली असता सदर बाबतीत वन गुन्हा या अगोदरच नोंद केल्याचे सांगितले. त्यांना प्रत्यक्ष जाय मोक्यावर बोलावून वन गुन्ह्याविषयी ठाकूर यांनी चौकशी केली असता सदरील मोकळ्या जागेत असलेल्या २६ लाकडी नगा विषयी अज्ञाताविरोधात वन गुन्हा नोंद केल्याचे सांगितले परंतु जागेवर ८० ते ९० नग दिसून आले. गुन्हा दाखल केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याची भिती नसल्यामुळे नव्याने साठा केल्याचे वनरक्षक यांनी नमूद केले अधिकच्या नगाबाबत वन गुन्हा नोंद करण्यात आला.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे नरसी येथील लक्ष्मी नारायण स्वामी साॅ मिलची तपासणी केली असता लिंबाच्या झाडाची लाकडे अवैध साठवल्याचे दिसून आल्याने साँ मिल सिल करण्यात आली असल्याची माहिती सहायक वन उपसंरक्षक ठाकूर यांनी दिली असून. जप्त करण्यात आलेल्या माला विषयी पुढील चौकशी सुरू आहे असे सांगितले. या सर्व प्रकारात देगलूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून आल्याने त्यांचीही झाडाझडती घेतली असल्याचे समजले आहे.
सहायक वन संरक्षक ठाकूर यांनी बुधवारी दिवसभर धाडसत्र व तपासणी केली असली तरी मांजरम विभागातून दररोज सागवानाची तस्करी होत आहे याबाबत काहीही चौकशी केली नाही. पण एका बड्या व्यापाऱ्याच्या घरी थांबून पाहुमचार घेतला असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा