शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पंचायत समिती नायगाव अंतर्गत नरसी येथे पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण ग्राम संघातील समित्या देण्यात आले. बँक जोडणी समिती ,गट मुल्यमापन समिती, सूक्ष्म नियोजन उपजिविका आराखडा समिती , सामाजिक समस्या मुल्यमापन समिती, सदर समिती अशा पाच दिवसीय विविध समित्यांची मांडणी करणे, बांधणी करणे व त्यांचे योग्य नियोजन करून अभ्यासपूर्वक माहिती घेण्याचे नियोजन पंचायत समिती अंतर्गत करण्यात आले होते.
या पंचायत समिती अंतर्गत असलेल्या निवासी प्रशिक्षणासाठी वर्धा येथील दोन प्रशिक्षणार्थी महिला सौ. प्रगती सचिन शंकदरवार वरिष्ठ वरधिनी वर्धा, संध्या नारायण उघडे वरिष्ठ वरधिनी वर्धा, नरसी येथे पाच दिवस राहून प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणासाठी नायगाव तालुक्यातील 89 गावांमधील चार सर्कलमधील महिला ग्राम संघातील पदाधिकारी हजर राहिले त्यांना जेवण व हे नाश्त्याची सोय पंचायत समिती अंतर्गत करण्यात आल्याची माहिती यांनी सांगितले.
या प्रशिक्षणासाठी पंचायत समिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रभाग समन्वयक श्री गंगाधर मोरे , श्री बालाजी गिरी , यांची उपस्थिती लाभली त्या सदर महिलांना प्रशिक्षण र नरसी येथील समूह संसाधन व्यक्ती अर्थास आयसीआरपी , रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर, संगीता जाधव नरसी, राधाबाई शिंदे टेंभुर्णी, वनिता कांबळे मुगाव, सुगराबी शेख नरसी, दैवशाला वाघमारे शेळगाव गौरी, यांनीही पण मेहनत घेतली व महिलांना वेळोवेळी मदत करण्यासाठी सहकार्य केले अशी माहिती ही त्यांनी दिली. यावेळी कुंटूर सर्कल बरबडा सर्कल मांजरम सर्कल नरसी सर्कल मधील गावातील महिला आयसीआरपी व ग्राम संघातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सर्व कार्यक्रम उत्कृष्ट संपन्न करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा