नरसी येथे ४ मार्च लाईनमन दिवस आनंदात साजरा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
जनमित्र लाईनमॅन हा आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र मेहनत घेतात म्हणून विविध कार्यक्रमातून जनतेना प्रकाशात आनंद लुटता येते पण लाईनमन सुरक्षित तर महावितरण कंपनी सुरक्षित आहे तेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यावी तुमच्यामुळे आपला संसार कुटुंब आणि महावितरण कंपनी सुरक्षित राहील असे प्रतिपादन आयोजित कार्यक्रमात महावितरण कंपनी उपविभागीय कार्यालय नायगाव शाखेची सहाय्यक अभियंता सुरेंद्र दुधमल यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनाने 4 मार्च हा लाईनमन लाईनमन दिन म्हणून घोषित केल्या नंतर महावितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गानी आनंद व्यक्त करून चार मार्च हा लाईनमन दिन नरसी येथे साजरा करण्यात आलेल्या वेळी अध्यक्षस्थानी इंजिनीयर पठाण तर इंजिनिअर सोनकांबळे इंजिनियर जाधव इंजिनिअर सुरेंद्र दुधमल यासह प्रधानतंत्रज्ञ येलेवाड,एल डी सी खाडे ,प्रिन्सिपल टेक्निशन लुटे, वडजे, कोटकर माजी एल डी सी मधुकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रारंभी सुरक्षा साधनाचा सर्व जनमित्रांनी वापर करण्यासाठी शपथ ग्रहण केली.
यावेळी जनमित्र विक्रम भालेराव, जनमित्र पाशा मामा, कलुरे साहेब, रामराव नांदुरकर, धोंडीबा सूर्यवंशी, शंकर भोजुनिलेवार, अहेमद साहब खाकि साहब, हनुमंत कोकणे, मौलाना बासुमिया, मोहम्मद जिलानीसाहब, फकिरसाब महेबुब साब, हरीशचंद्र भेदेकर, विठ्ठल भेदे,राम गौड,याश्मिन युशुब मियां शेख,एम.एच, मोरे,शेख अहेमद खादर, कृष्णा अढाव,मुक्तारभाई,बाळुहरी भेदेकर, मधुकर बोडके, विकास भालेराव,माधव मेकाळे,कदम साहेब, ऑपरेटर काळेवार, येलवारे, ऑपरेटर प्रार्थना सोनकांबळे बालाजी मेकाळे चव्हाण जगदीश, गुरुडमवार, देशमुख,वनसागरे, सम्राट सूर्यवंशी अधिजनाची उपस्थिती होती,तर शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना दिनदर्शिका यावेळी वाटप करण्यात आली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा