शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे शाहीर चंद्रकांत गायकवाड यांचे सुपुत्र आहेत अविनाश गायकवाड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
समाजाच्या विविध प्रश्नाविषयी सातत्याने आवाज उठविणारे प्रजासत्ताक पार्टी व फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे तालुकाप्रमुख अविनाश चंद्रकांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सन्मान करून भावी कार्यास शुभेच्छा दिले.
महापुरुषांच्या विचारावर अधिष्ठान मानून ते विचार पुढे नेण्यासाठी व उपेक्षित समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेने प्रजासत्ताक पार्टी आणि फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्यांनी सक्रिय पणे काम करणारे प्रसिद्ध शाहीर चंद्रकांत गायकवाड देगावकर यांचे सुपुत्र अविनाश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटना व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आलेल्या वेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, पत्रकार माधव बैलकवाड ,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार, जनमित्र विक्रम भालेराव, प्रकाश महिपाळे, पत्रकार शिवाजी कुंटूरकर, आठवले गट व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे, दीपक गजभारे, किरण वाघमारे, परमेश्वर जाधव, प्रदीप जोंधळे लालवंडीकर यांनी अविनाश गायकवाड यांना भरभरून शुभेच्छा दिले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा