क्रांतीपिता वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बैठक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
शतकांनु शतके मातंग समाज अतिशय प्रामाणिक वागत अनेकांशी इमानदारी दाखवली मग ते गावातील पाटील असो की, विविध राजकीय पुढारी असो या सर्वांसोबत इमानदारी दाखवली पण आमच्या समस्या विषयी कोणीही इमानदारी दाखवली नाही म्हणून मुंबई आझाद मैदान येथे जवाब दो आंदोलन होणार आहे असे प्रखड मत आयोजित बैठकीत समाज नेते मारुती वाडेकर यांनी व्यक्त केले.
शहरातील जुनी तहसील येथे क्रांतीपिता वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस ज्येष्ठ नेते मारुती वाडेकर, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम कुमार गवाले, निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, माजी सरपंच पंढरी इंगळे, माजी उपसरपंच नामदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण, जनमित्र विक्रम भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी क्रांतीपिता लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले व उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मारुती वाडेकर म्हणाले की, दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई आझाद मैदानावर मातंग समाजाच्या विविध प्रश्नाविषयी जवाब दो आंदोलन आयोजित केले आहे तरी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि एकजुटीचा आवाज बुलंद करावा असेही आवर्जून त्यांनी यावेळी सांगितले.
प्रस्तावनेत सदर कार्यक्रमाची पार्श्वभूमी बैठकीचे आयोजक गंगाधर कोत्तेवार यांनी मांडले तर प्रितमकुमार गवाले, पत्रकार माधव बैलकवाड यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
यावेळी पत्रकार मधुकर जवळे,शेख आरीफ, माजी सरपंच तथा पत्रकार प्रल्हाद भंडारे, शिवाजी कुंटूरकर,माधव गायकवाड, माणिक कोत्तेवार, देविदास सूर्यवंशी,बबलु सूर्यवंशी, मानवहित लोकशाही पक्षांचे नायगाव तालुकाप्रमुख अक्षय बोयाळ, युवक तालुकाध्यक्ष पूनमजी धमणवाडे, पंडित गवाले यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा