शिवप्रेमी मध्ये उसळली प्रचंड संतापाची लाट
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या कर्तुत्वाला जगभरातून विनम्र अभिवादन होत असले तरी नायगाव तालुक्यातील विविध गावात वादग्रस्त म्हणून असलेले ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पायात बूट घालूनच पुष्पहार अर्पण केल्याने अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून निलंबन करण्याची मागणी शिवप्रेमीतुन होत आहे.
जगभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तव्याला मानाचा मुजरा केला जातोय त्यात विविध कार्यालय, राजकीय, सामाजिक विविध संघटना देखील अभिवादन करत असताना नायगाव तालुक्यात अनेक गावात वादग्रस्त कंत्राटी ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पण एका महान कर्तत्वान राजाला आपण अभिवादन करतो पण ते कसे करावे हे देखील भान मुदखेडे यांना राहिले नाही, कारण त्यांच्या पायात बूट घालूनच पुष्पहार अर्पण केल्याने त्याचा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे म्हणून शिवप्रेमीकांचा ग्रामसेवक मुदखेडे विषयी संताप व्यक्त केला असून त्यांना निलंबन करण्यात यावे अशी शिवप्रेमीतून मागणी पुढे येत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा