युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाडे यांनी केली मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुदखेड तालुक्यातील खुजडा उप ग्रामीणमध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी स्टॉप देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाडे यांनी ही मागणी केली आहे.
ग्रामीण भागातील विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णासाठी खुजडा येथे उपकेंद्र असून नसल्यासारखे आहे कारण या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी स्टॉप नसल्याने रुग्णाची हेळसांड कित्येक दिवसापासून होत आहे. परंतु याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही आणि रुग्णांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने खुजडा उपकेंद्रामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी स्टॉप देण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
खुजडा उप ग्रामीण मध्ये एकूण स्टॉप किती जणांचा आहे त्यात दैनंदिन दररोज नोकरीवर कोणी येतात की गैरहजर राहतात याची चौकशी वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे. आणि यासह वैद्यकीय साठाचा ही देखील चौकशी करणे गरजेचे असल्याचे ग्रामीण भागातील नागरिकांतून चर्चा होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा