maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्हा परिषद देगांवच्या शाळेत रंगला चिमुकल्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा

चिमुकल्यांच्या गीत नृत्य  सादरीकरणाला उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद

Children's Cultural Festival at Degaon District School, naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुलांचा सर्वागीन विकास व्हावा या उद्देशाने शासन वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असते. विध्यार्थ्यामध्ये विविध कलागुण जोपासले जावे. शिक्षणा बरोबरच त्यांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने देगांव येथील जिल्हा परिषद शाळेत 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला सत्यम शिवम सुंदरम या गीताने बहारदार सुरुवात झाली. सास्कृतीक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, महापुरुषांचे गीत, लोक जागृती गीत, अशा अनेक गीतामध्ये या शाळेतील चिमुकली मुले अप्रतिम नृत्य  सादर करून उपस्थितांचे मनं जिंकले, उपस्थित नागरिकांनी भरभरून साथ दिली.

Children's Cultural Festival at Degaon District School, naigaon, nanded, shivshahi news,

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव विभुते, मा.गटशिक्षणाधिकारी एम.जे.कदम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.जे.कदम, अशोक बावणे,रत्नाकर कोटूरवार,डी.टी.सर, गंगाधर माऊले,उत्तमजी गायकवाड, सुरेश बाराळे, मंगेशजी हनवटे,मन्सूर शेख,पठाण सर, पवार सर,किसराळीकर सर, डी बी कदम सर,पचलिंग सर, भीमराव बैलके सर,साने गुरुजी शाळेतील मुख्याध्यापक माधव देवाले सर, कोंडावार सर,शिंदे सर, बेळगे सर उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यावर अप्रतिम अभिनय नृत्य सादर केले, यामध्ये अंगणवाडीचे बालकं ही सहभागी होते .देशभक्तीपर गीत जलवा जलवा,एक बटा दो दो बटे चार अंगणवाडी गीत,सत्यम शिवम सुंदर, विसरू नको रे आई बापाला लोक जागृती गीत, गेली माझी सखी बायको गेली, सध्याचे प्रसिद्ध गाणं चंद्रा अप्रतिम लावणी, पिंगा ग पोरी पिंगा, देव एक पायाने लंगडा,चला जेजुरीला जाऊ,टिपरी गीत,तामिळ गीत ओ आंटे मामा, बुलेट बंडी, हमु बाबा काका ना अशा अनेक गाण्यावर अप्रतिम नृत्य करून प्रेषकांची मने जिंकली.
यावेळी गावातील सरपंच प्रतिनिधी छत्रपती मोरे,उपसरपंच सरस्वती वनशेट्टे, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मोरे,संचालक रावसाहेब मोरे, सेवानिवृत्त शि.वामनराव मोरे सर, सावरगावे सर .ग्रामपंचायत सदस्य  गोविंद उपासे,  पत्रकार रामकृष्ण मोरे  अंकुशकुमार देगांवकर यांच्या सह असंख्य पालक, माता मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जांभळीकर सर यांनी केले तर बसवेश्वर गुडपे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पठाण सर,  मुख्याध्यापक एफ.के.शेख सर,उत्तम वडजे सर,जांभळीकर सर,सालेगाये सर, अंगणवाडी शिक्षिका शेरे मॅडम, मनुरकर मॅडम, कार्लेकर मॅडम, देगावकर मॅडम,शिवकांत नरवाडे ,शुभम नरवाडे यांचे सहकार्य लाभले .
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !