कंपनी मालकावर कारवाई करण्याची युवा सेनेची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गेल्या अनेक महिन्यापासून कुष्णुर एमआयडीसीतील अनंत सर्जिकल व जी डी बांल्क या कंपनीत अवैधरित्या लाकडांचा भरमसाठ साठा जमविला जात असून शासनाची वृक्षतोडीवर बंदी असतानाही शासनाच्या नियमाला पायदळी तुडवीत सदर कंपनी आपल्या मस्तखोर भांडवलीशाहीमुळे कंपनी वेगाने चालण्यासाठी भरमसाठ लाकडांचा साठा जमवित असल्याने त्या कंपनी मालकाविरोध योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नायगाव युवा सेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कुंटूरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कुष्णूर एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या आपल्या व्यवसायासाठी दुकान थाटून सज्ज आहेत पण आपली कंपनी वेगाने चालावे म्हणून सदर एमआयडीसी मधील अनंत सर्जिकल व जीडी ब्लॉक या कंपनीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून अवैधरीत्या लाकडांचा साठा मोठ्या प्रमाणात जमविला जात आहे. याबाबत उपवनरक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असून सदर कंपनी मालकावर कारवाई होने गरजेचे असल्याचे मत या निवेदनात नमूद केले आहे. नायगाव वनपरिक्षेत्र याबाबत उदासीनता दाखवीत असल्याने तालुका वनरक्षक गजानन कोटलवार व वनपाल श्री गुरुपवार यांना अनेक वेळा विनंती करूनही अर्ज देऊनही कुठलीच सदर कंपनी मालकाविरोध कारवाई केली नसल्याने सदर दोन्हीही कंपनी मालकासह कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड व उपवनरक्षक साहेब नांदेड यांच्याकडे युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी कुंटूरकर यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा