कोरोना नंतर 61 कोटींचे दान ; सात किलो सोने व 65 किलो चांदीच्या दागिन्याची भर
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
कष्टकरी शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कोरोना नंतर विठुरायाच्या खजिन्यात तब्बल 61 कोटींचे दान जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे. तर अवघ्या दोन वर्षात सात किलो सोन्याचे व 65 किलो चांदीच्या दागिन्याची खजिनाथ भर पडली आहे.
दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरीच्या विठुरायाची महती सातासमुद्रापार गेली असून देशासह परदेशातूनही अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येते येतात. वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीच्या रकमेतही भरीव वाढ झाली आहे. अलीकडेच नांदेड येथील एका भाविकाने पावणेदोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने विठुरायाला गुप्त दान म्हणून अर्पण केले आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या प्रयत्नामुळे देणगीदारांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी वर्षभर बंद होते. तरीही देखील भाविकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून विठुरायाला बारा कोटीचे दान दिले होते.
मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. सध्या दररोज किमान 50 हजाराहून अधिक भाविक पंढरीत येऊन विठुरायाचे दर्शन घेतात. नुकत्याच झालेल्या माघी यात्रेसाठी विक्रमी चार लाख भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा काळात मंदिर समितीला चार कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. दिवसेंदिवस मंदिराच्या उत्पन्नात भरघोस अशी वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
गेल्या वर्षीच्या ( २०२१ - २०२२ ) आर्थिक वर्षात विठुरायाच्या खजिन्यात वीस कोटीचे दान जमा झाले होते. यंदा 31 जानेवारी अखेर पर्यंत तब्बल 41 कोटी 44 लाख 58 हजार रुपयांचे भरभरून दान जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील 31 जानेवारी अखेरपर्यंत दुपटीने उत्पन्नात वाढ झाली आहे. यामध्ये दोन वर्षात तब्बल 60 किलो वजनाचे सोन्याचे तर 76 किलो चांदीच्या दागिन्याची भर पडली आहे . वाढत्या सोन्या-चांदीच्या वर रोख देण्यामुळे देवाचा खजिना अधिक समृद्ध होऊ लागला आहे. मंदिर प्रशासनाने नुकतेच अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये उत्पन्न वाढीचे अनेक पर्याय सुचवण्यात आले असून पुढील वर्षी 60 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
कोरोना नंतर मंदिर समितीच्या उत्पन्नात भरी वाढ झाली आहे. गतवर्षी मंदिर समितीला 20 कोटी 47 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षातील 31 जानेवारी अखेरपर्यंत 41 कोटी 44 लाख 58 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये दोन वर्षांमध्ये सात किलो सोने व 76 किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 60 कोटी उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.बालाजी पुदलवाडव्यवस्थापकश्री विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा