जि.प.प्रा. शा. मरवाळी येथील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्ह्य प्रतिनिधि शिवाजी कंटूरकर
नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे स्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळा च्या वतीने दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी हि साध्या पद्धतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक,व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी हिंदवी स्वराज्या चे संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवजन्मोत्सव,शिवजयंती निमित्त दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी मरवाळी येथील मारोती मंदिरा समोर सकाळी नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे चे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. या वेळी शिवजन्मोत्सव शिवजयंती निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतुन भजन,टाळ मृदंगा च्या मधुर आवातून भजन करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गावात मिरवणूक काढण्यात आली.
गावातील जि.प.प्राथमिक शाळा मरवाळी येथील विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर भाषने व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. व सायकांळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे आयोजक गजानन ऊ.चिखले,चंद्रकांत पवळे, ,प्रताप पवळे,सुभाष चिखले,गजु पा.चिखले, गजानन पा.वडजे,पांडुरंग तळणे,संजय जाकोरे,पंढरी पवळे,हानमंत वाडीकर, यांच्यासह या कार्यक्रमास गावातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा