पर्यटन मंत्री, कौशल्य विकास मंत्री, तथा महिला व बालविकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा, व शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव रणजितसिंग देओल, यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, औरंगाबाद (प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजी नगर)
विद्यार्थ्यांची आणि समाजाची समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षकांना राज्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा क्रांतीज्योती सावित्रिमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अर्थात गुणगौरव पुरस्कार, पर्यटन मंत्री,, कौशल्य विकास मंत्री,, तथा महिला व बालविकास मंत्री,ना. मंगलप्रभात लोढा, व शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव रणजितसिंग देओल, यांच्या शुभ हस्ते प्रा. डॉ. संजय गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे रंगशारदा कला मंदिरात आयोजित समारंभात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
वस्तुनिष्ठ पद्धतीने स्थानिक पातळी, जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर मुलाखती घेऊन शिक्षकांचे परीक्षण करून पारदर्शक पद्धतीने ही निवड करण्यात आली.
प्रा डॉ गायकवाड यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रु.१,१०,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमास कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, शिक्षक आमदार, कपिल पाटील, संचालक, कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, महेश पालकर, शिक्षण उपसंचालक, संदीप सांगवे यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑनलाईन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा