शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या महान कार्यामुळे देशभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन केल्यानंतर नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले आहे.
प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केल्यानंतर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या महान कर्तव्याने सर्व बहुजन समाज समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण करणारे संत गाडगेबाबा यांना या जयंतीदिनानिमित्त मौजे कुंटूर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आलेल्या वेळी डॉक्टर विलास पवार, वसंत शिवाजी पाटील होळकर ,राम बाबुराव पाटील अडकिने, उद्धव हनुमंते, गायकवाड कुंटूरकर, शिवाजी रेनेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा