कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघात होत आहे पोटनिवडणूक
शिवशाही वृत्तसेवा, पुणे ( प्रतिनिधी अभिषेक जाधव )
पुणे दि २३:-
जिल्ह्यातील २०५-चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ च्या अनुषंगाने निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी निरीक्षक आणि मतमोजणी सहायकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आणि उपजिल्हाधिकारी तथा मतमोजणी समन्वयक सिद्धार्थ भंडारे यांनी अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. मतमोजणीच्या वेळी येणाऱ्या अडचणीच्या निराकरणाबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच ईव्हीएम यंत्रविषयी माहिती देण्यात आली.
मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमानुसार होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि या प्रक्रियेत पारदर्शकता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे असे श्री.भंडारे यांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा