शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यावर विमा कंपनीला निर्देश
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
उमरी व नांदेड जिल्ह्यातील सन 2022 23 या खरीप हंगामा साठी 1562 गावातील शेतकरी आपल्या पिकांचा विमा अनुक्रमे सोयाबीन , कापूस, टूर, ज्वारी, उडिद,मुग इत्यादी पिकांचा यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस पिक विमा कंपनी कडे शेतक-यांनी पीक विमा हप्ता भरण्यात आला होता जिल्हयातिल शेतकरी 68.00 कोटी रुपये ,राज्य शासन हिस्सा 227 कोटी रुपये, केंद्रीय शासन 227 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडे भरणा करण्यात आला 15 अगस्त 2022 ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधी 21 दिवसांचा पावसाचा खंड पडला असल्याने शेतातील पिकांची मोठे आतोनात नुकसान झाले
या बाबींकड़े शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी 5 सप्टेंबर 2022 ते 7 सप्टेंबर2022 या तीन दिवसा मध्ये उमरी तालुक्यातील मनूर व बोलसा गावच्या शेतकर्यांनी भजन कीर्तन करुण विमा कंपनीच्या विरोधात जन आंदोलन केले होते त्यानंतर जिल्हाधिका-यांनी या आंदोलनाची दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस,तूर,ज्वारी या चार पिकांचा आग़ाऊ 25 % रक्कम तातडिने विमा कंपनी ला जिलाधिकारी यांचाआदेश देण्यात आला त्यानंतर सप्टेंबर अक्टूबर-नवंबर 2022 या तीन महीना च्या कालावधी नांदेड़ जिल्ह्यातिल सर्व गावा मध्ये अतिवृष्टि झाली नदी नाल्यांना महापूर येऊन गोदावरी काटच्या गावांना पाण्याचा विळख्यात पडून शेतातील पिकांची मोटे नुकसान झाले
या सर्व घटनेचा मा.अभिजीत राउत जिलाधिकारी महोदयाने दखल घेऊन संबंधित महसूल यंत्रनेला पंचनामा करण्याचे आदेश दिले नांदेड़ जिल्ह्यातिल सर्व शेतकर्यांनी विमा कंपनी कड़े पिकांची नुकसान झालेल्यांनी तक्रार नोंदवली तसेच तलाठ्यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष दर्शनी शेतकं-यांच्या समक्ष पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केले आजपर्यंत सहा महिने चा कालावधी होऊनही देखील शेतक-यांना पिकविम्याची उर्वरित रक्कम खात्यात जमा केली गेली नाही दिं.9जानेवारी 2023 निषेध मोर्चा घेण्याचे निवेदन जिल्ह्याधिकारी यांना सादर केले जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्रा द्वारे असे कळविण्यात आले की,पदविधर मतदार संघाची निवडणूक व आचार संहिता असल्याने बैठक व मोर्चे व आदोलंने आयोजन करता येत नाहीत दिं.20 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6ः00 सुमारास मा मा.अभिजित राउत जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पिकविमा संदर्भात सखोल चर्चा होऊन पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांचा खात्यात उर्वरीत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले उमरी तालुक्यातील शेतक-यांचे शिष्टमंडळ विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक रत्नाकर मुंडकर, कृषि कार्यालय प्रमोद गायके, डॉक्टर भगवान राव पाटिल मन्नूरकर, उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख तथा समन्वय समिति तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील शिंदे, तालुका संघटक कैलाश पाटिल पवार हातनीकर, शेतकरी माधराव पोलीस पाटील शिंदे बोलसा, बाबूराव पाटील जाधव कुदळेकर आदि शेतकरी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा