३० व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा. (राज सारवडे)
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ सालच्या ३० व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.ऍड.श्री नंदकुमार भागवत पवार यांचे शुभहस्ते व धनश्री परिवाराचे संस्थापक मा.प्रा.श्री शिवाजीराव बाजीराव काळुंगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन मा.श्री राहूल शहा (शेठजी), जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक मा.श्री रामकृष्ण नागणे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. सदर प्रसंगी या हंगामातील ऊसाने भरलेल्या शेवटच्या बैलगाडी,ट्रॅक्टरचे पुजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सांगता समारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानें कारखान्याचे संचालक मा.श्री मुरलीधर सखाराम दत्तू व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्षा मा.सौ.अरुणा मुरलीधर दत्तू या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना धनश्री परिवाराचे संस्थापक मा.प्रा.श्री शिवाजीराव बाजीराव काळुंगे म्हणाले, दामाजी साखर कारखान्याने हा गळीत हंगाम यशस्वी केलेला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत दामाजी कारखाना सोलापूर जिल्हयात दुसऱ्या क्रमांकावर रहिला आहे. ही बाब अभिनंदनीय आहे.जेवढा साखर उतारा जास्त तेवढा जादा पैसा निर्माण होत असतो. कारखाना वेळेत सुरु होतो की नाही हा प्रश्न होता. परंतु श्री प्रशांत परिचारक,श्री भगिरथ भालके यांचे सहकार्य तसेच राहूल शहा, रामकृष्ण नागणे, दामोदर देशमुख आदिंनी आर्थिक सहकार्य केल्यामुळेच कारखाना वेळेत सुरु होवू शकला. संचालक मंडळ डिस्टीलरी प्रकल्पासाठी प्रयत्नशिल आहे. यापुढील काळात डिस्टीलरीशिवाय कारखानदारीला आर्थिक आधार मिळणार नाही. संचालक मंडळाने चांगले नियोजन केल्यानेच हा गळीत हंगाम यशस्वी झाला आहे. त्यामुळे हे संचालक मंडळ अभिनंदनास पात्र असल्याचे काळुंगे सर यांनी सांगीतले.
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले, ही संस्था सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे यासाठी व्हा.चेअरमन श्री.तानाजीभाऊ खरात व आमचे संचालक मंडळ कटिबध्द् आहे. या गळीत हंगामात कारखान्याने ११५ दिवसात ३,८२,००० मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. यावर्षी ऊसाचे टनेज कमी निघाल्याने गाळप कमी झाले आहे. सध्या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे.टन प्रतिदिन असुन येणाऱ्या हंगामापासुन प्रतिदिन ५००० मे.टन करण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करित आहे. या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगार पगार,तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले वेळेवर दिलेली आहेत. येत्या पंधरा दिवसांत हंगामअखेर गळीतास आलेल्या ऊसाचे बिलही संचालक मंडळ देणार असल्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे वेळी प्रमुख पाहुणे माजी चेअरमन ऍड.नंदकुमार पवार म्हणाले, हा कारखाना चालू होण्यापूर्वी या कारखान्याचे भवितव्य अंधकारमय होते. परंतू सर्व जेष्ठ मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखाना वेळेत चालू होवून गळीत हंगाम यशस्वी होवू शकला आहे. संत दामाजी पंतांची कृपा आपल्यावर आहे. म्हणूनच या कारखान्याला आता चांगले दिवस आले आहेत. तालुक्यातील सभासदांनी मोठा विश्वास दाखवून या संचालक मंडळाला निवडून दिलेले आहे. त्यामुळे या कारखान्याचे वैभव वाढविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा यांनीही आपल्या मनोगतामध्ये कारखाना चांगला चालविल्याबध्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.सदर प्रसंगी लतिफ तांबोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना गळीत हंगामाचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. गळीत हंगाम यशस्वी केल्याबध्द्ल तालुक्यातील सर्व सभासदांच्या वतीने प्रा.शिवाजीराव काळुंगे व ऍड श्री नंदकुमार पवार यांनी चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात व संचालक मंडळाचा सत्कार केला. तसेच या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा, ऊस वाहतूक, तोडणी केलेल्या बैलगाडी,डंम्पिंग व ट्रॅक्टर ठेकेदारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, जिजामाता महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ.आशाताई रामकृष्ण नागणे, माजी संचालक श्री भारत पाटील, जालींदर व्हनुटगी, तसेच चंद्रशेखर कोंडूभैरी, ऍड.रविकिरण कोळेकर, बबलू सुतार, विद्यमान संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, पी.बी.पाटील, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, आणि ऍड.दत्तात्रय खडतरे, दौलत माने,गडदे गुरुजी, संपत गडदे, डॉ.माणिक पवार, प्रमोद पुजारी, अशोक पवार, सचिन नागणे, तानाजी कटारे, दत्ता करे, पांडूरंग माळी, मनोज माळी, माधवानंद आकळे, हेमंत निकम, अनिल घोडके,अशोक पवार, ऍड.दुधाळ, नवनाथ रोकडे, दिपक रोकडे, चांगदेव माने, गोपाळ कांबळे, भिमाशंकर पुजारी, तायाप्पा गरंडे, बाबासोा पडोळकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद,ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. तोडणी वाहतुकीचे जास्तीत जास्त काम केलेले ठेकेदार दयानंद गरंडे,सुनिल जाधव,बंडु करे, लक्ष्मण गरंडे, मधुकर सोलनकर, सखराम पठाडे,आप्पा सानप, वसंत दोलतडे,हरी घोडके,विष्णु चव्हाण यांचा संचालक मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा