एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, मात्र परिसरात भीतीचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा. (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला.
तिन्ही महिलाची प्रेते घरासमोर अत्यावस्थ पडली होती.या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले. हत्येच्या कारणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
या तीन महिलाच्या खुनामुळे नंदेश्वर गावावर शोककळा पसरली असून, अचानक झालेल्या खून सत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तपासाअंती या खुणाचे कारण स्पष्ट होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा