चिंचवड विधानसभा मतदारसंघांचे लोकप्रतिनिधी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभा जागेची सध्या पोटनिवडणूक लागली आहे. सदर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार म्हणून श्रीमती आश्विनी जगताप या निवडणुकीस सामोरे जात आहेत. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अतिशय संवेदनशील आणि भावनिक वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडत आहे. राज्याच्या विधिमंडळ सभागृहामध्ये एक मार्गदर्शक व सहकारी म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांना नेहमीच ज्यांची मोलाची साथ लाभली असे स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी श्रीपती अश्विनी जगताप या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राजकीय जाणकारांची गणिते चुकीची ठरवून दिमाखदार विजय प्राप्त करणारे आमदार समाधान आवताडे हे श्रीमती आश्विनी जगताप या भगिनीसाठी पायाला भिंगरी लावून चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये प्रचाराची राळ उठवत आहेत. देवभूमी आणि संतभूमी मतदारसंघाचा एक कर्तबगार लोकप्रतिनिधी पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शिरसावंद्य मानून श्रीमती जगताप यांच्या विजयासाठी अहोरात्र झटत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसाय व उच्च शिक्षणानिमित्त चिंचवड या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्यास आहेत. या सर्व मतदार नागरिकांना एका छताखाली संघटित करून आमदार समाधान आवताडे त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेत भारतीय जनता पार्टीची व्यापक ध्येय- धोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर दिसत आहेत. पंढरपूर मंगळवेढा - विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आखाड्यात मायबाप जनतेच्या मतदारारूपी आशीर्वादाने आमदार म्हणून जनतेच्या सेवेत रुजू झालेले आमदार समाधान आवताडे हे चिंचवड येथील एका भगिनीसाठी पुढे सरसावल्याने श्रीमती अश्विनी जगताप यांच्या विजयाचा वारू अधिक वेगाने पुढे पाऊल टाकत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीमध्येही एका विधानसभा कार्यक्षेत्राची जबाबदारी यशस्वीपणे पेलणारे आमदार आवताडे हे भारतीय जनता पार्टीचे एक कुशल आणि संघटनात्मक लोकप्रतिनिधी व प्रचारक म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे.
एक ते दीड वर्षांमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीचा उपलब्धता करून सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा परत जोमाने संक्रमित करणारी आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यपद्धतीचे नेटके समीकरण चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या पसंतीस उतरत आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या या सर्वसमावेशक प्रचार रणनीतीमुळे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या उमेदवार श्रीमती अश्विनी जगताप यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा