शिवराज पाटील होटाळकर शुभहस्ते अशोक बामणे व अमोल कंकाळ यांची कुस्ती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त जंगी कुस्त्यांचा सामना व जत्रा महोत्सव भरन्यात आला शेवटची कुस्ती ५ हजार रुपयाची माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या तर्फे लावण्यात आली.सदर कुस्ती शिवराज पाटील होटाळकर शुभहस्ते अशोक बामणे बामणी व अमोल कंकाळ खडकूत,यांची लावण्यात आली.
शेळगाव छत्री गावानजीक पहाडावर ठिकाणी महादेव मंदिर असून सदर मंदिराच्या परिसरात जत्रेची व जंगी कुस्त्यांचा सामना भरवण्यात आला होता. गेल्या आठ दिवसापासून शेळगाव छत्री येथे सर्व धर्मीय शिवनाम अखंड सप्ताह चालू होता यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार यांनी आपली किर्तन रूपी सेवा बजावली या शिवनाम सप्ताहाची दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सांगता करण्यात आली.
दिनांक २० फेब्रुवारी रोज सोमवार रोजी समस्त गावकऱ्यांच्या वतीने
महादेव मंदिर परिसरात जत्रा व कुस्त्याचा सामना ही परंपरा गावकऱ्यांनी कायम ठेवली. आज शेळगाव छत्री येथे होणाऱ्या सदर जत्रेच्या व कुस्त्याचा सामना सर्वांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन माजी सरपंच संजय पा. अनेराये, मारोतराव पा. सालेगाये, संजय मालीपाटील आनेराये, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पा. आनेराये, मारुती अप्पा मठपती, विठ्ठल पाटील आणेराये, बालाजी नारायण पा. आनेराये, राजेश आनेराये पेहलवान यांनी केले आहे.
जत्रा व कुस्त्याचा सामना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गंगाधर शंकर पा. आनेराये, शिवाजी गोविंद पा. आनेराये, गंगाधर नागोराव कुंभार, वसंत भीमराव पा. आनेराये, सुरेश गणपती पा. आनेराये, विजय बालाजी पा. आनेराये, माधव मारुती पा. आनेराये यासह मलिकार्जुन मठपती, दिलीप दिगंबर सालेगाये, गजानन धम्मे, माधव भाऊराव पा. आनेराये, मारोती सालेगाये,आनेराये सर,केरबा सालेगाये, माधव ऍजपवाड आदिने परिश्रम घेतले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा