परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मांन्यवरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला होता.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक व शिक्षीकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विविध मांन्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मुलींनी सुंदर असे लेझीम चे सादरीकरण केले. मोफत बॉडी चेकअप शिबिर आयोजित केले होते. यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. तसेच पंढरपूर शहरातून भव्य शिवरॅली काढण्यात आली.
या प्रसंगी विक्रम बिस्किटे, राजेंद्र गिड्डे, सतीश धनवे, हनुमान कदम, छाया आगलावे, राजश्री लोळगे, वर्षाराणी शिंदे, शुभांगी भोईटे, आशा बागल, जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, गुरुदास गुटाळ, संतोष जाधव, राजू देवकर, शिवाजी मोरे, सुनील झिरपे, अमोल पवार, रोहित चव्हाण, वैभव चव्हाण, लखन चव्हाण, शामराव साळुंखे, थिटे, काका यादव, गणेश काळे, नागेश गायकवाड, श्रीनाथ माने, महेश माने, सागर आनंदाते, नितीन थिटे, संतोष घाडगे, पांडुरंग शिंदे, बालाजी गायकवाड, तुकाराम गंगथडे, यशवंत बागल, ऋषिकेश शिंगारे, दिनकर माने, रतन थोरात , अर्चना चव्हाण, विजया कदम, वनिता मोरे, ज्योतीताई शिंदे, राणीताई गुटाळ, सुप्रिया शिंदे , विजया खामकर, डॉ संगीता पाटील, संगीता थिटे मराठा महासंघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित शिवभक्त व शिवप्रेमी व मराठा समाज सह कुटुंब सहपरिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा