केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड येथे अनेक समाजासाठी जागा आणि सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आलेले आहे परंतु गोसावी समाजासाठी जागाही उपलब्ध नाही आणि सभागृही नाही
त्यासाठी नांदेड शहरात जागा उपलब्ध करून देऊन गोसावी समाजासाठी सांस्कृतिक सभागृह देण्यात यावी अशी मागणी परमपूज्य योगी श्याम भारती हिंगोली लोकसभा यांनी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नांदेड शहरात विविध कार्यक्रमासाठी गोसावी समाजासाठी सांस्कृतिक सभागृह होणे गरजेचे असल्याने या मुख्य मागणीसाठी नांदेड शहरात गोसावी समाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि सांस्कृतिक सभागृह देण्यात यावे अशी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे परमपूज्य योगी श्याम भारती हिंगोली लोकसभा यांनी ही मागणी केलेली आहे दिलेल्या निवेदनावर दत्ता आनंदा बन होटाळकर, रावसाहेब महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, गुरुनाथ पेढाकर ,बाबू महाराज, अरुणापुरी नांदेड यांच्याही या मागणीसाठी निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा