देशभक्तीपर गीत, महापुरुषांचे गीत, लोक जागृती गीत, व नृत्य सादरीकरण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथे सांस्कृतिक बालमहोत्सव आविष्ष्कार -२०२३ कार्यक्रम १६ फेबुरवारी रोजी सायंकाळी उत्साहात साजरा झाला. या मध्ये सादर केलेल्या कला विष्काराने उपस्थितांची मने जिंकले
या संस्कृतीक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, महापुरुषांचे गीत, लोक जागृती गीत, अशा अनेक गीतामध्ये या शाळेतील चिमुकली मुले अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितांचे मनं जिंकले, उपस्थितीताने भरभरून साथ दिली शिक्षण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमात सत्यम शिवम सुंदरम या गीताने बहारदार सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव विभुते होते. संस्कृतिक विचार मंचावर सन्माननीय तालुक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी माननीय एम. जे.कदम साहेब, माननीय व्ही जे कदम सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, माननीय अशोक बावणे सर शिक्षक नेते, रत्नाकर कोटूरवार संचालक भास्कर पतपेढी नायगाव, चिंतावार चेअरमन भास्कर पतसंस्था, डी. टी. सर तालुका अध्यक्ष शिक्षण परिषद, गंगाधर माऊले सर शिक्षक नेते अखिल शिक्षक संघटना, उत्तमजी गायकवाड सर तालुकाध्यक्ष इब्टा शिक्षक संघटना,सुरेश बाराळे अध्यक्ष तालुकाध्यक्ष अखिल, मंगेशजी हनवटे केंद्रप्रमुख सुजलेगाव मन्सूर शेख ,जे आर पठाण सर , मुख्याध्यापक व्ही एस.पवार सर सांगवी, प्रमोद केसराळीकर सर सांगवी, पदोन्नत मुख्याध्यापक डी बी कदम सर, संजय पचलिंग सर, लसाकम तालुका अध्यक्ष भीमराव बैलके सर, पूज्य साने गुरुजी शाळेतील मुख्याध्यापक माधव देवाले सर, कोंडावार सर, शिंदे सर, बेळगे सर उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यावर अप्रतिम अभिनय नृत्य सादर केले, यामध्ये अंगणवाडीचे बालकं ही सहभागी होते देशभक्तीपर गीत जलवा जलवा, एक बटा दो दो बटे चार अंगणवाडी गीत, सत्यम शिवम सुंदर, विसरू नको रे आई बापाला लोक जागृती गीत, गेली माझी सखी बायको गेली, सध्याचे प्रसिद्ध गाणं चंद्रा अप्रतिम लावणी, पिंगा ग पोरी पिंगा, देव एक पायाने लंगडा, चला जेजुरीला जाऊ, टिपरी गीत, तामिळ गीत ओ आंटे मामा, बुलेट बंडी, हमु बाबा काका ना अशा अनेक गाण्यावर अप्रतिम नृत्य करून प्रेषकांची मने जिंकली.
या वेळी विद्यार्थी अविष्कार बालमहोत्सव या कार्यक्रमाचे उपस्थित परिसरातील शिक्षक गावकरी व प्रेक्षकांनी कौतुक केले यावेळी गावातील सरपंच प्रतिनिधी छत्रपती मोरे, उपसरपंच वनशेट्टे ताई, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग पाटील मोरे, पूज्य साने गुरुजी शाळाचे संचालक रावसाहेब मोरे, सेवानिवृत्त शिक्षक वामनराव मोरे सर, सावरगावे सर ग्रामपंचायत सदस्य हाजिपाशा शेख, गोविंद उपासे, राहुल गायकवाड. पत्रकार रामकृष्ण मोरे पत्रकार अंकुश गायकवाड यांच्या सह असंख्य पालक, माता मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन जांभळीकर सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा देगाव यांनी केले व बसवेश्वर गुडपे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य जे आर पठाण सर सेवानिवृत्तशिक्षक यांचे मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक एफ के शेख सर, उत्तम वडजे सर, एस एन जांभळीकर सर, एच के सालेगाये सर, अंगणवाडी शिक्षिका शेरे मॅडम, मनुरकर मॅडम, कार्लेकर मॅडम, देगावकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य व शिवकांत नरवाडे,शुभम नरवाडे, लक्ष्मण, यांचे सहकार्य लाभले .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा