जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथील आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक पंच तथा प्रशिक्षक प्राध्यापक जयपाल रेड्डी यांना घरात घुसून धक्काबुक्की तसेच अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. प्रणिता जयपाल रेड्डी यांनी दिलेल्या तक्रारीत चंद्रकांत आढाव व इतरांनी लक्ष्मण फुलारी यांच्या सांगण्यावरुन घरात घुसून धक्काबुक्की तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ केली व घरावर दगडफेकही केल्याचे म्हटले आहे. यावरुन चंद्रकांत आढाव, लक्ष्मण फुलारींवर गुन्हा दाखल झाला असला तरी सदर आरोपी विरोध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आमचा कोणासोबतही वैर नाही पण आमच्या बिजनेस बाबतीत अनेक जण मनातल्या मनात जळतात म्हणून माझ्या कुठुंबास जीविताला धोका वाढला आहे.
प्रा.जयपाल रेड्डी यांनी दिलेल्या पोलीस जबाबात आपल्या जीवितास संबंधितांकडून धोका असून प्रशासनाने तात्काळ त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून मला संरक्षण द्यावे अशी विनंती त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे, सदर लक्ष्मण अशोक फुलारी हा शासकीय नौकारीला देखील असून पण प्रायव्हेट जिमनॅस्टिक क्लास पोलिस कॉलनी येथे चालवतात हे पोलिस प्रशासनास प्राध्यापक जयपाल रेड्डी यांनी निर्धनास आणून दिले आहे जयपाल रेड्डी यांचा क्लास बंद पडावा, लोकांना गैरसमज करून आपल्या जिमनॅस्टिक क्लास जोरात चालावा म्हणून नेहमी प्रा जयपाल रेड्डी यांची लक्ष्मण अशोक फुलारी बदनामी करण्याचे काट कारस्थान करत आहेत असे जयपाल रेड्डी यांनी माहिती दिली.
प्रा जयपाल रेड्डी हे मागील वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून जिम्नॅस्टिक या खेळासाठी वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणून देशभर ओळखलं जातं त्यांच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त करून नांदेडचा नावलौकिक पंचक्रोशीत मिळविला आहे. एखादा स्वकष्टाने आपल्या व्यवसायामध्ये पुढे जात असताना त्यांच्या व विरुद्ध आगपाखड करणे असे निचवृतीचे सदर आरोपीचे काम आहे. म्हणून त्यांच्याकडून माझ्या जीवदास कधीही धोका होऊ शकतो, मला संरक्षण देणे गरजेचे आहे, असेही रेड्डी म्हणाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा