जन्मभूमी सेनगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जन्मभूमी सेनगाव येथे महाराष्ट्रातून बहुजन समाज अभिवादन करण्यासाठी जयंतीच्या निमित्ताने एकत्र आले असता राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना त्रिवार अभिवादन केल्यानंतर दैनिक वैराग्यमूर्तीचे संपादक सतीश सांबसकर यांचा वैरागी मूर्तीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी यादवराव इबीतदार कुंटूरकर यांनी सन्मान केला आहे.
अमरावती जिल्हा दर्यापूर तालुक्यातील मौजे सेनगाव हे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जन्मभूमी उभं आयुष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांनी समाज प्रबोधनाचा विडा उचलला असून रंजल्या गांजल्या लोकांसाठी त्यांच्या भल्यासाठी कीर्तनरुपी सेवा केली स्वच्छतेचा संदेश दिला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि कोणत्याही माणसांनी कोणाचं फुकट खाऊ नये यांचीही स्वतःपासून त्यांनी कृती केली म्हणून ते जगाच्या इतिहासाच्या पानावर अजरामर झाले आहेत. त्यांचे विचाराची पाईक अनुयायी व बहुजन समाज बांधव यांनी सेनगाव येथे जाऊन नतमस्तक झाले
या जयंती दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकप्रिय दैनिक वैराग्य मूर्ती या दैनिकातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे आचार विचार सांगणारे संपादक सतीश भाऊ सांबसकर यांच्या दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सन्मान चिन्ह देऊन वैराग्यमूर्तीची नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी यादवराव ईबिदार कुंटूरकर यांनी त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी उपसंपादक मयूर अशोकराव सोहळीकर, हनुमंत कोटकर, गजानन पिंपळे, ज्ञानेश्वर पांचाळ, बालाजी जाधव यासह अनेकांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा