शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी येथे केला सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार ७५ हजार ८४१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. पालकांचे वार्षिक साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आणि अनुदानित शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार या प्रमाणे बारावीपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. यंदा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ डिसेंबरला एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती.
१ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे. कोलंबी येथील श्री. शंकरराव चव्हाण मध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी वर्गात शिकणारा कु. नागेश उत्तम दरेगावकर (बैलके ) हा मौजे. दरेगाव येथील आर्थिक दुर्बल घटकातील सामान्य कुटुंबातील असून त्याच्या यशाबद्दल अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. श्री. शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी येथे त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी, पोलीस पाटील सोनमनकर,देविदास पा सोनमनकर,,संचालक एम के बुरपल्ले,मुख्याध्यापक व्ही जी अमिलकंठवार,पालक सोनू बैलके, उत्तम बैलके,केरबा सोनमनकर,बामणे सर,पांडे सर,रामशेटवाड, होटकर,देशपांडे सर, सलेगाय ,शेख, मारकवाड आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा