पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मारेकऱ्याना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने काळया फिती लावून तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मारेकऱ्याना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले. तसेच यानिमित्तानं पुन्हा एकदा एकत्र येत जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या एकजुटीचं दर्शन घडविले.
मराठी पत्रकार परिषदेच्या गुरुवारी ( दि.९ ) झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले होते. त्यानुसार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी ( दि. १० फेब्रुवारी ) दुपारी २ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने काळया फिती लावून तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मारेकऱ्याना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष गोवर्धन बियाणी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे,चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर , जिल्हा सरचिटणीस राम तरटे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, कोषाध्यक्ष कृष्णा उमरीकर, शहर महानगराध्यक्ष शिवराज बिच्चेवार, सुरेश काशिदे,महेंद्र देशमुख,संघरत्न पवार, कमलाकर बिरादार, गजानन कानडे, राजकुमार कोटलवार, नरेंद्र गडप्पा, प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद लोहेकर, योगेश लाठकर, लक्ष्मण भवरे,पंडीत वाघमारे, सुभाष पेरकेवार, गंगाधर गच्चे, सुनिल पारडे, सतीश मोहिते, प्रभाकर लखपत्रेवार, नंदकुमार कांबळे, कुंवरचंद मंडले, अमरदिप गोधने, किरण कुलकर्णी, प्रदीप लोखंडे, अंकुशकुमार देगावकर, प्रशांत गवळे, मुजीब शेख, सुधीर प्रधान, नरेश दंडवते, सुरेश आंबटवाड, सदाशिव गच्चे, राजेंद्र झंवर, आनंद कुलकर्णी, गंगाधर सूर्यवंशी, चंद्रकांत गव्हाणे, शेख जावेद, भास्कर जामकर, ज्ञानेश्वर सूनेगावकर, करणासिंह बैस, रामचंद्र देठे, किरण कांबळे, प्रदीप घुगे आदीसह असंख्य पत्रकार उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा