maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री विठ्ठल प्रशालेत पुणे विभागीय शालेय मुले मुली कुस्ती स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न

कुस्तीपटूंनी दाखवलेले कसब रसिकांना भावले

wrestling match, Shri Vitthal Prashala and Arts, Science Junior College, abhijit patil, shivshahi news, pandharpur,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 03:00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित तालुका क्रीडा अधिकारी, पंढरपूर व श्री विठ्ठल सह.सा. कारखाना लिवेणुनगर श्री विठ्ठल प्रशाला व कनिष्ट महाविद्यालय, वणुनगर ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार माढा लोकसभा मतदार संघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थान मा. श्री. मा. आ. नारायण (आबा) पाटील यांनी भूषविले.
01 व 12 जानेवारी 20023 रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेचा समारोप समारंभ श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे व प्रशाला कमिटीचे चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी मा. श्री महादेव कसगावडे उपसंचालक क्रीडा व युवक संचालनालय पुणे मा. श्री. नितीन तारळकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी, मा. श्री सत्येन जाधव साहेब तालुका क्रीडा अधिकारी, गणेश पवार सर राज्य अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदशक, श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे का. चेअरमन मा. सौ. प्रेमलता रांगे, प्राचार्य बी. पी. रांगे. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, महाराष्ट्र केसरी पै.छोटा मगर, पै. रावसाहेब मगर उपमहाराष्ट्र केसरी प.भरत मंकाले प्रमुख उपस्थित होते. यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक- निबाळकर स्पर्धक खेळाडूना उदेशून म्हणाले की कोणत्याही खेळात प्रामाणिकपणे मेहनत केल्यास यश मिळतंच हे प्रतिकुल परिस्थितीतूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविल्याचे पे करतारसिंग पे खशाबा जाधव यांचे उदाहरण देवून सांगितले.
श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील स्पर्धेच्या उद्धघाटन प्रसंगी बोलताना म्हणाले को आजचे युग हे स्पर्धेचे असून त्या स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर अभ्यासाबरोबरच व्यायामाची गरज आहे. म्हणूनच जगाच्या स्पर्धेमध्ये तसेच ऑलम्पिक मध्ये भारताला स्थान मिळवायचे असेल तर खेळाडूना चांगल्या शिक्षणाबरोबर आर्थिक ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले.
मा. श्री नारायण (आबा) पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज खेळाडूना खऱ्याअर्थाने शिष्यवृत्ती देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी केले तर प्रमुख पाहुण्याचे स्वागत श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. विठ्ठलराव नागटिळक यांनी केले यास्पर्धेमध्ये पुणे शहर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर व ग्रामीण सोलापूर शहर व ग्रामीण या जिल्हयातील नामवंत 480 कुस्ती खेळाडूनी भाग घेऊन डोळयाचे पारणे फेडणान्या कुस्त्या करून कुस्तीरसिकांना मंत्रमुग्ध केल सर्व विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारीतोषक मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. या पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून धनराज भुजबळ, अंकुश अकिले, नितीन शिंदे, राजेंद्र कनसे तानाजी केसरे, जितेंद्र कनसे यांनी उत्कृष्टपणे काम केले.
या प्रसंगी श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे सर्व संचालक, मा. संचालक विभिषण पवार, पंढरपूर केसरी सोमनाथ सुर्वे, शेखर भोसले, सपाट सर. नागेश यादव, तुर्गतगावचे संरपंच डॉ. अमृता रणदिवे, अजीतोगावचे सरपंच अमरजीत पवार कारखान्याचे अधिकारी, कामगार, सभासद, पालक शेतकरी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच प्राचार्य व्ही. जी. नागटिळक यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले कुस्ती स्पर्धेचे समालोचन श्री राजु देवकते व प्रमोद माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. चव्हाण एस बी तर पर्यवेक्षक नागणे एस.के यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !