शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
आज बाळासाहेब भवनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची उजनी पाणी बचाव संघर्ष समिती च्या शिष्टमंडळाने भेट घेतली व विठ्ठलाला प्रिय असणारा तुळशीहार घालून पंढरीचा प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला व विनंती केली की श्री विठ्ठलाच्या पायावरती लोळण घालत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणारी चंद्रभागेच पाणी बारामतीकर दरोडा घालून चोरत आहेत ते आपण लक्ष घालून वाचवावे व आमच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली... यावेळी मुख्यमंत्री मोहदयानी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर अन्याय होऊ देणार नाही व दोन चार दिवसात बैठक घेऊन तातडीने निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी अतुल खूपसे पाटील ,माऊली भाऊ हळणवर ,मुबिना मुलानी, समाधान सुरवसे,वनिता बर्फे, राणा महाराज वाघमारे रामभाऊ तरंगे यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा